Gokul Election News: गोकुळ दूध संघावर चार शासननियुक्त संचालक नेमण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कायदेशीर सल्ला दिल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफांनी यावर भुमिका मांडली आहे. “भूषण गवई सर म्हणत असतील, तर हा निर्णय कायद्यात टिकणार नाही. पण पुन्हा तीच समस्या निर्माण होणार आहे,” असे मुश्रीफ म्हणाले. "मुख्यमंत्री, तीन मंत्री आणि दहा आमदारांना दोन्ही हाताला बांधून त्यांनी पोस्टर लावले. निवडणुकीत जय-पराजय होतच असतो. पण माझ्या मुलाच्या पराभवाबद्दल त्यांनी जातीयवादी प्रचार केला हेच मनाला लागले आहे", असेही मुश्रीफ म्हणाले.
गोकुळच्या निवडणुकीतील जय-पराजयाबाबत बोलताना मुश्रीफांनी आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता टीका केली. “जय-विजय सर्वांना मिळत असतो; मात्र त्याचा उन्माद असता कामा नये,” असा टोला त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री, तीन मंत्री आणि दहा आमदारांना लक्ष्य करत पोस्टर लावण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी निवडणुकीत पराभव होणे स्वाभाविक असल्याचे सांगितले. मात्र, आपल्या मुलाच्या पराभवासाठी जातीयवादी प्रचार करण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “धर्मनिरपेक्ष पक्षात राहून शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि विरोधात जातीय विष पेरायचे, ही जखम मनावर खोलवर गेली आहे,” असे मुश्रीफ म्हणाले.
"स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनात संदर्भात भूमिका पार पाडण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर दिली होती. काल चार तास झालेल्या बैठकीत ऊसाला पहिली उचल ही 3900 तर हंगाम संपल्यानंतर शंभर रुपये, 4500 रुपये प्रतिक्विंटल साखर गेली तर 200 रुपये आणि त्यावर जर साखर विक्री झाली तर 70-30% चा फॉर्मुला निश्चित करण्यात आला आहे. मी राजू शेट्टी आणि शेतकरी संघटनांचा आभार आहे त्यांनी कारखानदारांचा प्रस्ताव मान्य केला". सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी शेट्टी यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मंत्री मुश्रीफ यांनी मानले.
"गोकुळ मध्ये विशिष्ट परिस्थिती आली आहे, हे मी अनेकदा सांगितलं आहे. राज्यातील हा एकमेव दूध संघ आहे. जिथे सभेचा कोरम 14 इतका आहे. नियम पाहिले तर तीन बैठक संचालक अभावी तहकूब झाल्या तर संघावर प्रशासक येतो. जर प्रशासक निवडला तर निवडणूक होऊ शकते. हे रोखायचं असेल आणि लोकशाही टिकवायची असेल तर शासन नियुक्त संचालक निवडण्याशिवाय आमच्याकडे मार्ग नव्हता. आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचे स्थान मिळाले असेल तर त्यांचा अध्यक्ष करण्यासाठी आमचे लोक का जातील. कायद्यामध्ये '14' चा कोरम असल्यामुळे डेडलॉक तयार झालेला आहे". असे स्पष्टीकरण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले .
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.