Sharad Pawar Health : मोठी बातमी! गौतम अदाणी शरद पवारांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल

Gautam Adani meets Sharad Pawar : प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुरूवातीला शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांनी दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Sharad Pawar Health | Gautam Adani | Breach Candy Hospital
Sharad Pawar Health | Gautam Adani | Breach Candy HospitalSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News, 06 Nov : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती साम टीव्हीने दिली आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुरूवातीला शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. 2 नोव्हेंबर रोजी छातीत दुखणे आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवले होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

मात्र, पुण्यातील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही तासांतच शरद पवार यांना पुढील तपासणी आणि उपचारांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar Health | Gautam Adani | Breach Candy Hospital
Raju Shetti : अखेर राजू शेट्टींचं आंदोलन स्थगित! 3,900 रुपये पहिली उचल, नेमका फॉर्म्युला काय ठरला?

दरम्यान, शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी 5 नोव्हेंबर रोजी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली. मात्र, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar Health | Gautam Adani | Breach Candy Hospital
Vaibhav Chavan Death : बोगस प्रमाणपत्रांद्वारे सरकारी नोकरी मिळवणाऱ्यांचे रॅकेट उघड करणाऱ्या वैभवचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ

प्रफुल पटेल यांच्या भेटीनंतर आता प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांनीही ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शरद पवार आणि गौतम अदाणी यांच्यातील संबंध पाहता या भेटीलाही महत्त्व प्राप्त झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.