Hasan Mushrif
Hasan Mushrif  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

गजानन कीर्तीकरांनी रोहित पवारांवर केलेल्या आरोपांना हसन मुश्रीफांनी दिले उत्तर : म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे ग्रामीण विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुश्रीफ यांनी शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी कर्जत तालुक्यात केलेल्या आरोपांना प्रतिउत्तर दिले. ( Hasan Mushrif responds to allegations made by Gajanan Kirtikar against Rohit Pawar )

अहमदनगर जिल्ह्यात 1 लाख 16 हजार मेट्रिक टन ऊस शिल्लक आहे. याबाबत हसन मुश्रीफ म्हणाले, या संदर्भात अहमदनगरचे जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांनी संयुक्त प्रयत्न सुरू केले आहेत. 10 ते 15 दिवसांत शिल्लक ऊस संपेल. कोणताही ऊस गाळपा विना शिल्लक राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्य सरकारला हे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत नेता येते. त्यामुळे इंधन आयातीवरील खर्च कमी झाला आहे. त्यामुळे देशाचे डॉलर्स वाचले आहे. त्यासाठी इथेनॉल निर्मितीला सवलती देणे, कर्ज उपलब्ध करून देणे ही योजना केंद्र सरकारने आणली आहे. साखर कारखाने साखर तयार करून कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे त्यांना बँका कर्ज देत नाही. अशा कारखान्यांसाठी ज्येष्ठे नेते शरद पवार यांनी पुढाकार घेऊन बंद पडलेले कारखाने, आजारी कारखाने, ज्या कारखान्यांत इथेनॉल निर्मितीसाठी बँका पुढे येत नाहीत. अशा तीन विभागात बैठक घेऊन दिलासा द्यावा अशी विनंती शरद पवार यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांनी काल (रविवारी) आमदार रोहित पवार यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर देताना हसन मुश्रीफ म्हणाले, तीन पक्षाचे राज्य आहे तिथे थोडासा संघर्ष होतोच. मुंबई, ठाण्यात त्यांचे बहुमत आहे. तिथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला न्याय मिळत नाही. जिथे एखाद्या पक्षाचे प्राबल्य असते तिथे इतर पक्षावर थोडासा अन्याय होत असतो. मुख्यमंत्री हे तीनही पक्षाच्या महाविकास आघाडीचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसेने बरोबरच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांबरोबर बसून निधी बाबत निर्णय घ्यावा. ते मुख्यमंत्री असल्याने त्यांना कोणत्याही खात्याचा मंत्री चुकत असेल तर त्याला सांगण्याचा अधिकार आहे. तीनही पक्षाच्या आमदारांना घेऊन बैठक केल्यास अशा तक्रारी होणार नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांनी सत्तेचा गैरवापर करून नागरदेवळाली नगरपंचायत केल्याचा आरोप केला होता. या संदर्भात त्यांनी सांगितले की, नगरपंचायत अशी करावी याचे काही निकष आहेत. ग्रुप ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रुपांतर कसे करावे याचे नियम आहेत. त्यानुसार ते होते. ज्यावेळी हरकत व सूचना मागविल्या होत्या त्याच वेळी त्यांनी हरकत घ्यायला हवी होती. त्यांना अन्याय वाटत असेल तर त्यांनी न्यायालयात जावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT