रोहित पवारांनी आम्हाला अहिल्यादेवींच्या जयंतीची परवानगी मिळू दिली नाही : राम शिंदे

अहिल्यादेवींची जयंती ही राष्ट्रवादीचा मेळावा न होता ती सार्वजनिक जयंती उत्सव व्हावा, असं आमचं म्हणणं आहे.
Ram Shinde
Ram ShindeSarkarnama

मुंबई : प्रशासनावर दबाव आणि दडपशाही करून राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) सत्तेचा दुरुपयोग करत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवाची आम्हाला चौंडी (ता. जामखेड, जि. नगर) परवानगी दिली नाही. जयंतीनिमित्त मी दरवर्षी नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करतो, त्याला आमदार रोहित पवारांकडून (Rohit Pawar) आडकाठी आणण्यात आली. ही अहिल्यादेवींची जयंती नसून राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आहे, असा आरोप कर्जत-जामखेडचे माजी आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी केला. (pressure of Rohit Pawar we did not get permission for Ahilya Devi Jayanti : Ram Shinde)

माजी आमदार राम शिंदे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार रोहित पवार यांच्या जोरदार टीका केली. ते म्हणाले की, या वर्षी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं स्वरूप या वर्षी जरा वेगळं आहे. दरवर्षी कुठला पक्षीय अभिनिवेश, झेंडा न ठेवता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. अहिल्यादेवींच्या चरणी निष्ठा आणि भक्ती ठेवून राज्यातील नागरिक मोठ्या संख्येने जयंती उत्सवात सहभागी होतात. जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून त्याचे नियोजन मी करत असतो. सर्व संघटना आणि राजकीय पक्षांच्या लोकांना त्यात समाष्ठि करून घेण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण, या वर्षी समितीची कुठलीही बैठक घेतली नाही. प्रशासनावर दबाव आणि दडपशाहीचे धोरण राष्ट्रवादीने राबविले.

Ram Shinde
फडणवीसांनी भाजपच्या तीनही जागांच्या विजयाचं असं मांडलं गणित!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सत्तेचा दुरुपयोग करत प्रशासनाला हाताशी धरून जयंती उत्सवाची कुणालाही परवानगी दिली नाही. मी गेल्या अनेक दिवसांपासून जयंतीनिमित्त राज्यभरातून येणाऱ्या भक्तांसाठी दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन करतो. त्या महाप्रसादालाही स्थानिक आमदार रोहित पवारांनी आडकाठी आणली. महाप्रसादासाठी जो मंडप घालण्यात आलेला होता, तोही काढून टाकण्यात आला. कोणालाही विश्वासात न घेता ते जयंती उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, ती जयंती नसून तो राष्ट्रवादीचा मेळावा आहे. जयंती उत्सवासाठी जो मंडप उभारण्यात येत आहे, त्याला राष्ट्रवादीचे झेंडे आणि फलक लावण्यात येत आहेत. त्यातून अहिल्यादेवींचा जयंतीउत्सव राष्ट्रवादी काँग्रेस करतेय, असे चौंडीमध्ये दिसून येत आहे, असेही राम शिंदे यांनी स्पष्ट केले.

Ram Shinde
महाडिकांनी वाढविले शिवसेनेचे टेन्शन : विजयासाठीच्या १० मतांची व्यवस्था झालीय

माझे नातू रोहित पवार यांच्या मतदारसंघात अहिल्यादेवींचा जन्म झाला, असे ज्येष्ठ नेते शरद पवार हे जेजुरीत बोलताना म्हणाले होते. त्यामुळे पवार यांच्या मनात अहिल्यादेवींबाबत काय आदर आहे, हे यावरू दिसून येते, असा प्रश्नही शिंदे यांनी उपस्थित केला. पवार कुटुंबीय हे कधी नव्हे ते अहिल्यादेवींच्या जयंतीला येत आहे. ते समाज बांधवांच्या जखमेवर मोठे चोळले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, कर्जत जामखेडमध्ये नदी खोलीकरणाचे काम करण्यात आले. मात्र, रोहित पवारांच्या बगलबच्चांनी वाळू उत्खनन केले आहे. त्यांच्यावर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी. चौंडी ग्रामपंचायतीची ८० एकर जमीन रोहित पवार यांनी हडप केली आहे. अनेक गावच्या जमिनी हडप करण्याचे काम रोहित पवार आमदार झाल्यापासून सुरू आहे. सीना, घोड, कुकडीचे आवर्तन वेळेवर सुटलेले नाही, त्याकडे दुर्लक्ष करून इव्हेंट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Ram Shinde
दोन राजेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण

सत्तेचा माज आणि मस्तीच्या माध्यमातून रोहित पवारांनी दबावातून जयंती उत्सवाचे स्वरुप बदलेले आहे. मला राज्यभरातून फोन येत आहेत. मात्र, हे पवित्र स्थान आहे, अहिल्यादेवीचं जन्मस्थळ आहे, त्यामुळे त्या ठिकाणी कोणतंही कृत्य होऊ नये, यासाठी आम्ही संयम बाळगला आहे. सुमित्रा महाजन यांच्या कार्यक्रमातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यानंतरही आम्ही संयम बाळगला. याचा अर्थ तुम्ही काही करायचं, असं होत नाही. त्यामुळे अहिल्यादेवींची जयंती ही राष्ट्रवादीचा मेळावा न होता ती सार्वजनिक जयंती उत्सव व्हावा, असं आमचं म्हणणं आहे, असे राम शिंदे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com