Hasan Mushrif, Samarjit Singh Ghatge
Hasan Mushrif, Samarjit Singh Ghatge sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भाजपच्या घाटगेंना हसन मुश्रीफ समर्थकांचं जशासं तसं उत्तर!

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी लागलेल्या बॅनरवरुन सुरु झालेला वाद आता पोलीस ठाण्यात पोचला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी प्रकरणी मोर्चा घेऊन नुकतेच थेट कागल पोलीस ठाणे गाठले होते. आता याला आक्रमकपणे प्रत्युत्तर देण्यासाठी मोर्चा घेऊन मुश्रीफ समर्थक आज पोलीस ठाण्यात गेले. मुश्रीफांची बदनामी करणाऱ्या घाटगेंवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी कागल शहरातील राम मंदिराला राजकीय अड्डा बनवले आहे. हसन मुश्रीफ यांची जन्मतारखेवरून त्यांनी बदनामी सुरु केली आहे, असा आरोप समर्थकांनी केला. घाटगे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करीत हसन मुश्रीफ समर्थकांनी कागल पोलीस ठाण्यावर आज मोर्चा काढला. या मोर्चाला कागल शहरातील बसस्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली.

घाटगे यांच्या निषेधार्थ शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा काढण्यात आला. या वेळी रामनामाचा जयघोष करीत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या घोषणा देत मोर्चा पोलीस ठाण्यावर पोचला. मोर्चातील प्रमुख कार्यकर्त्यांनी खर्डेकर चौकातील राम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. पोलीस ठाण्यासमोर आलेला हा मोर्चा पोलिसांनी बाहेरच अडवला. त्यानंतर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या वेळी अनुचित प्रकार घडू नये, म्हणून राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, समरजितसिंह घाटगे यांनी मुश्रीफांवर आरोप केले होते. ते म्हणाले होते, प्रभू श्रीरामांच्या नावाबरोबर हसन मुश्रीफ यांचे नाव जोडण्याचा झालेला प्रकार निंदनीय आहे. तसेच रामनवमीला जन्माला आल्याचा मुश्रीफांचा दावाही खोटा आहे. त्यांचा जन्म रामनवमीला नाही तर रंगपंचमी दिवशी झाला आहे. कारण विकिपीडिया वरती 24 मार्च 1954 ही तारीख आहे. तर सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला दिलेल्या कागदपत्रांमध्येही हीच जन्मतारीख आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT