मलिकांच्या अडचणीत वाढ! तुरुगांतील मुक्काम संपेना

राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे अडचणीत आले आहेत.
Nawab Malik News Updates
Nawab Malik News UpdatesSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) अटक केली आहे. यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. मलिक हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत न्यायालयाने 22 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. यामुळे मलिक यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. (Nawab Malik News Updates)

गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी मलिक यांनी पैसे दिले. पारकरने ते दाऊद इब्राहिमला दिले, असा दावा करत हे 'टेरर फंडिंग` असल्याचा आरोपी ईडीने केला आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 4 दिवस म्हणजेच 22 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्यांची मागणी लावून धरली होती. तर महाविकास आघाडी सरकारने मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका घेतली होती.

Nawab Malik News Updates
मोठी बातमी : लखीमपूर खीरीत भाजप आमदाराच्या गाडीखाली दोन जण चिरडले

दरम्यान, आधी न्यायालयाने मलिक यांच्या तीन मागण्या मान्य केल्या होत्या. न्यायालयीन कोठडीत बेड, गादी आणि खुर्ची देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याआधीही मलिक यांच्या तीन मागण्या न्यायालयाने मान्य केल्या होत्या. ईडीच्या कोठडीत असताना घरचे जेवण मिळावे, चौकशीदरम्यान आपल्या वकिलांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी आणि रोजची औषधे घेऊ द्यावीत, अशा तीन मागण्या करण्यात आल्या होत्या. या तिन्ही मागण्यांना न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला होता.

Nawab Malik News Updates
धक्कादायक! कडक लॉकडाऊन असूनही चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यू

ईडीने अटक केल्याच्या विरोधात मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीची कारवाई चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला होता. हे प्रकरण 22 वर्षांपूर्वीचे असल्याचेही त्यांनी म्हटले होते. उच्च न्यायालयाने मलिक यांची ही याचिका फेटाळून लावली होती. यामुळे मलिक यांनी आता जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com