Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif : आता लाडकी म्हैस योजना आणावी लागेल; हसन मुश्रीफांचा टोला, नेमके काय म्हणाले?

Ladki Bahin Yojana : राज्यात फक्त गायीच्या दुधाला पाच रुपये अनुदान दिले जात. मात्र इतर राज्यात म्हशीच्या दुधालाही अनुदान मिळते.

Sunil Balasaheb Dhumal

कोल्हापूर: राहुल गडकर

Kolhapur Political News : सध्या राज्यात लाडकी बहीण योजनेचा मोठा गवगावा सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी महिलांची मते मिळवण्यासाठी आता सत्ताधाऱ्यांसह विरोधकही सरसावले आहेत. याच योजनेचा धागा पकडून मंत्री हसन मुश्रीफांनी राज्यात आता लाडकी म्हैस योजना आणावी लागेल, अशी मिश्किल टिपण्णी केली.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. यावेळी पाच राज्यात म्हैशीच्या दुधाला अनुदान दिले जाते, पण महाराष्ट्रात केवळ गायीच्या दुधाला अनुदान दिले जाते. राज्यात असा प्रयोग का होत नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. यावरून कोल्हापूरचे पालकमंत्री मुश्रीफ Hasan mushrif यांनी मजेशीर टिपण्णी केली.

मुश्रीफ यांनी, वास्तविक गोकुळच्या दुधाला मागणी आहे. गोकुळ हा राज्याचा ब्रँड करावा अशी आमची इच्छा आहे. सध्या राज्य सरकार गायीच्या दुधाला अनुदान देते. सध्या लाडक्या बहीण या योजनेवरून आर्थिक... इतकेच बोलून मुश्रीफ थांबले. त्यानंतर पुढे म्हणाले, गोकुळचे दूध संकलन वाढवण्यासाठी भविष्यात आम्हाला लाडकी म्हैस ही योजना आणावी लागेल.

उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे सांगताचं हसन मुश्रीफ यांनी तीच री ओढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढणार असे उपमुख्यमंत्री पवार म्हणत असतील तर त्यात गैर काय? असा प्रतिप्रश्न केला.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका यापूर्वीही काँग्रेससोबत असताना स्वबळावरच झाल्या आहेत. सर्वच पक्षाचे कार्यकर्ते इच्छुक असतात. त्यामुळे यापूर्वीही आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढले आहेत. त्यानंतर आम्ही एकत्र येत सत्ता स्थापन करत असतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

पूर परिस्थितीवर मुश्रीफ म्हणाले, मी सातत्याने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि कर्नाटकचे जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात आहे. अलमट्टी धरणातून दोन लाख पाणी सोडावे, अशी विनंती केली. त्यांनी त्याची अंमलबजावणी केली आहे. या फेजमध्ये धोका होईल असे वाटत नाही. तरी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. कोणतेही संकट आले तर त्याला तोंड द्यायला सरकार आणि प्रशासन तयार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT