Mumbai, 22 July : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मला घरी बोलावून दम दिला होता, असा खळबळजनक आरोप शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नितीन देशमुख यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या धनंजय मुंडे यांच्यावर शरद पवार गटांकडून गटाकडून वारंवार आरोप केले जात आहेत.
शरद पवार गटाचे प्रवक्ते नितीन देशमुख (Nitin Deshmukh) म्हणाले, लोणावळ्यात वॅक्स म्युझियम असून त्या म्युझियमध्ये प्रसिद्ध व्यक्तींचे पुतळे ठेवण्यात आलेले आहेत. त्यात भारतरत्न लता मंगेशकर, ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) ठेवलेले आहेत. त्या म्युझियममध्ये आम्ही भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचाही पुतळा ठेवणार होतो.
गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यानंतर अल्पकाळात आम्ही त्यांचा पुतळा बनविण्याचे ठरवले होते. पण हे जेव्हा तुम्हाला कळाले, त्यावेळी तुम्ही मला बंगल्यावर बोलावलं आणि दम दिला. गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा बनवाल तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही, असा दमही मला तुम्ही दिला होता, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची स्वतःच्या सख्ख्या काकांबाबत काय प्रतिक्रिया होती, हे सर्व महाराष्ट्राला कळले पाहिजे; म्हणून मी हे पुढे येऊन बोलत आहे. मी सांगतो त्यात तथ्य आहे की नाही ते धनंजय मुंडे, तुम्ही पुढे येऊन सांगा, असे आवाहनही नितीन देशमुख यांनी धनंजय मुंडे यांना दिले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्र बळकाविण्याचा आरोपही आमदार रोहित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला होता. तसेच, मुंडे यांनीच परळीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांना गोळीबाराच्या प्रकरणात अडकवले आहे, असाही आरोप त्यांनी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.