Hasan Mushrif Samarjeet Ghatge sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif Vs Samarjeet Ghatge : कागलचं राजकारण तापलं, मुश्रीफ- घाटगे कार्यकर्त्यांमध्ये 'फ्री स्टाइल' हाणामारी अन् दगडफेक

Kagal Assembly Constituency Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीतील दोघेही कट्टर राजकीय विरोधक एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकणार आहेत हे निश्चित झालं आहे. त्यामुळे दोघांनीही विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्याला दोघांनीही सुरुवात केली आहे. अशातच कार्यकर्त्यांनीही कागल विधानसभा मतदारसंघातील वातावरण चांगलं ढवळून काढला आहे.

Rahul Gadkar

Kagal News : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघात वादाची पहिली ठिणगी पडली आहे. पारंपारिक कट्टर विरोधक पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि समरजीत घाटगे यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. एका कार्यक्रमात हा प्रकार घडला. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली आहे.

आतापासूनच कागलच राजकारण पेटले आहे. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या इतर कार्यकर्त्यांनी या दोघा गटातील कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घडलेल्या प्रकारानंतर कागलमधील कैदी चौकातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते.

संपूर्ण राज्याचं आणि कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या कागल विधानसभा मतदारसंघातील लढत पहिल्यापासूनच हाय व्होल्टेज होत असताना पाहायला मिळत आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ हे महायुतीचे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडी कडून समरजीत घाटगे (Samarjeet Ghatge) हे निवडणुकीला सामोरे जात आहेत.

पारंपारिक राजकीय कट्टर विरोधक असलेल्या या लढतीत पहिल्यापासूनच राजकीय टीकाटिप्पणी आणि आरोप प्रत्यारोपाने गाजत आहे. असेच चित्र मतदार संघात असताना आज पहिली ठिणगी याच मतदारसंघातून पडली आहे.

कागल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार हा मुद्द्यांवरुन गुद्द्यांपर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. कारण मुश्रीफ आणि घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण होऊन तो हाणामारीपर्यंत पोहोचला. इतकंच नव्हे तर दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे नेते समरजीतसिंह घाटगे हे दोघेही महायुतीत होते. पण विधानसभेच्या तोंडावर घाटगेंनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार प्रवेश केला आणि कागलमधून तिकीटही मिळवलं होतं.

आगामी विधानसभा निवडणुकीतील दोघेही कट्टर राजकीय विरोधक एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकणार आहेत हे निश्चित झालं आहे. त्यामुळे दोघांनीही विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्याला दोघांनीही सुरवात केली आहे. अशातच कार्यकर्त्यांनीही कागल विधानसभा मतदारसंघातील वातावरण चांगलं ढवळून काढला आहे.

कागल मतदारसंघात मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे असा सामना होतो आहे. मुश्रीफ आणि घाटगे दोघांचे समर्थक आपला नेता विजयी होईल, असा दावा करत आहेत. मात्र, या दाव्याचे रुपांतर हाणामारीत झाले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दोन्ही गटाचे समर्थक आक्रमक झाले. त्यांच्यामध्ये वाद होत दोन नेत्यांच्या समर्थकांनी रस्त्यात हाणामारी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT