Kolhapur News : बिद्री कारखान्याची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी प्रचाराला रंगत आली आहे. आज सत्ताधाऱ्यांनी मेळावा घेत परिवर्तन आघाडीला चांगलेच धारेवर धरले. या मेळाव्यात पालकमंत्री मुश्रीफांची टोलेबाजी चर्चेचा विषय ठरली.
सत्ताधारी गटाला विमान चिन्ह मिळाल्यानंतर त्यांनी थेट विमानाची ॲक्शन करून बॉम्ब टाकून विरोधकांना बेचिराख करणार असल्याच म्हटलं. यावेळी मुश्रीफ यांनी ज्याप्रकारे ॲक्शन केली, त्याची चर्चा पंचक्रोशीत चांगलीच रंगात आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सत्ताधारी गटाला बिद्रीच्या निवडणुकीत विमान चिन्ह मिळाल्यानंतर पालकमंत्री मुश्रीफ यांनी " विमानातून येऊन ड्रोनद्वारे बॉम्ब टाकणार. इस्त्राईल-गाझामध्ये सुरु आहे, तसें करणार नाही. पण लोकशाही पाळून सगळं बेचिराख करणार, बिद्री कारखान्याच्या विकासाच्या आड येणाऱ्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही.'' असा इशारा दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनावर बोलताना मुश्रीफ यांनी, ''केंद्रसरकारने केवळ साखर दरावर नियंत्रण ठेवले आहे. केंद्रसरकारने दराबाबत मोकळीक द्यावी, आम्ही शेतकऱ्यांना 3500 ऐवजी 5000 रुपये दर देऊ. साखर दर नियंत्रणात ठेवायचे आणि दर द्या, म्हणायचं हे बरोबर नाही. त्याबाबत केंद्र सरकारसोबत लढाई करायला हवी.'' असंही बोलून दाखवलं.
याशिवाय ''तूर आणि इंधनाचे दर 100 च्या वर गेले, पण साखरेचे दर आहे तेच आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याची वाईट परिस्थिती आहे. सहकाराचे धोरण बदलणे आवश्यक आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारसोबत दिल्ली येथे लढाई करायला हवी. असं मुश्रीफ यांनी सांगितले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.