Pankaja Munde : ''जवळचं कमी दिसत होतं वाटतं, ते आता...'' पंकजा मुंडेंचं विधान चर्चेत!

BJP leader Pankaja Munde : जाणून घ्या, पंकजा मुंडे नेमकं असं का म्हणाल्या आहेत?
Pankaja Munde
Pankaja Munde Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या बऱ्याचदा त्यांच्या विविध विधानांमुळे चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या नाराजीच्या चर्चांनी जोर धरलेला असतो, तर कधी त्यांनी प्रसारमाध्यमांनी दिलेली एखादी विशिष्ट प्रतिक्रिया किंवा त्यांनी सोशल मीडियावर केलेली एखादी पोस्ट चर्चांना सुरुवात करून देत असते. अशाच प्रकारे आता त्यांच्या एका व्हिडीओवरून चांगलीच चर्चा सुरू झाल्याचे दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंकजा मुंडे यांना जवळचं स्पष्ट दिसण्याचा चष्मा लागला आहे. गोष्ट इतकीच नाही, तर त्यांनी ज्या हटके पद्धतीने चष्मा लागल्याची माहिती त्यांच्या समर्थकांसह सर्वांनाच दिली, त्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. शिवाय यासाठी त्यांनी केलेला एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Pankaja Munde
Chandrashekhar Bawankule : 'कॅसिनो' प्रकरणी आरोपावर बावनकुळेंची प्रथमच माध्यमांना प्रतिक्रिया, म्हणाले...

सोशल मीडियावरील व्हिडओत पंकजा मुंडे म्हणतात ‘एक मिनीट’, सरप्राईज...म्हणत डोळ्यावर चष्मा चढवत ‘ताईला चष्मा लागला’, ‘ताईला चष्मा लागला’ हे ‘आमच्या पप्पाने गणपती आणला’ या गीताच्या चालीवर म्हणत ‘लांबचा चष्मा नाही बरका, जवळचा चष्मा’ लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, जवळचं कमी दिसत होतं वाटतं, ते आता चांगलंच स्पष्ट दिसायला लागेल. छोटाचा नंबर आहे पण मला आता स्पष्ट दिसतय जवळचं. दूरचं तर आधीही चांगलं दिसत होतं आणि आताही अजून चांगलं दिसतं. कसा वाटतोय चष्मा? असंही पंकजा मुंडे यांनी विचारलं आहे.

दरम्यान, २० वर्षांपासून समाजकारण व राजकारणात असलेल्या पंकजा मुंडे अलिकडच्या काळात सोशल मीडियावर अधिक सक्रीय दिसत आहेत. आज त्यांनी जवळचा चष्मा लागल्याची बातमी ज्या हटके पद्धतीने दिली, त्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे.

(Edited by - Mayur Ratnapakhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com