Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushtif : हसन मुश्रीफांवर पोलिस बंदोबस्तात आरोग्य केंद्राचं उद्घाटन करण्याची वेळ का आली?

Rahul Gadkar

Hasan Mushrif Kolhapur : कागल विधानसभा मतदारसंघात लक्षवेधी आणि अत्यंत अटीतटीची लढत होणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला भेदण्यास शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि नुकताच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलेले समरसिंह घाटगे सर्वतोपरी सज्ज आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आहेत. त्यांनी काल कागल तालुक्यातील बाचणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन केले. मात्र आता याचे उद्घाटन आता घाटगे करणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम घाटगे विरूद्ध मुश्रीफ यांच्यातील राजकीय वादाला तोंड फोडणारा ठरला आहे.

कागल विधानसभा मतदारसंघात घाटगे आणि मुश्रीफ यांच्यात श्रेय वादाची लढाई सुरू झाली आहे. पालकमंत्री या नात्याने सर्वप्रथम तुमचा अधिकार असताना अशा पद्धतीचे उद्घाटन घेण्याची वेळ का आली? जिल्ह्याचे पालकत्व घेतलेल्या मुश्रीफांना पोलिसांचा सहारा घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन का करावे लागले? असा सवाल उपस्थित होत आहे.

कागल तालुक्यातील बाचणी येथे 2013 साली बाचणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आराखड्याला मंजुरी मिळाली होती. तेव्हापासून ते ११ वर्षापर्यंत या प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण झाले नसल्याचे चित्र होते. तर तेच केंद्र भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलेले शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मदतीने ही प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्णत्वाला नेल्याचा दावा केला जात आहे. आज त्याचा थाटामाटात घाटगे गट उद्घाटन समारंभ करणार आहे. तत्पूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काल पोलिसांचा बंदोबस्त लावत या रुग्णालयाचे उद्घाटन केलं. उद्घाटनानंतर कागल विधानसभा मतदारसंघात राजकीय वादाला तोंड फुटले आहे. आतापासूनच घाटगे आणि मुश्रीफ यांच्यात श्रेय वादाला सुरुवात झाली आहे.

हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांना बाचणी गावामध्ये जवळपास 500 पोलिसांचा बंदोबस्त लावून या रुग्णालयाचे उद्घाटन केले असल्याचे सांगितले जाते. दुपारनंतर या बाचणी येथे पोलीस (Police) छावणीचे स्वरूप आले होते त्यामुळे राजकीय वातावरण तापले होते. आज घाटगे गट नियोजित कार्यक्रमानुसार सरपंच उपसरपंचांसह याचा उद्घाटन सोहळा करणार होते. मात्र निवडणुकीच्या तोंडावर घाटगे यांना या रुग्णालयाचे श्रेय जाणार म्हणून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी रात्रीत जोडण्या लावत या रुग्णालयाचा उद्घाटन कार्यक्रम उरकून टाकला. शिवाय प्रोटोकॉलचा नियम पुढे करत पोलीस बंदोबस्तात या प्राथमिक आरोग्य केंद्राची भूमिपूजन आटपून घेतले.

दरम्यान समजीत घाटगे (Samarjit Ghatge) हे आज या रुग्णालयाच्या भूमिपूजनाचे उद्घाटन करणार आहेत. घाटगे नेमकी मुश्रीफ यांच्या बद्दल काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र तत्पूर्वी पालकमंत्री मुश्रीफ हे जिल्ह्याचे नेतृत्व करतात. या रुग्णालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला त्यांना इतका पोलिसांचा बंदोबस्त का घ्यावा लागला? हा सवाल उपस्थित होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT