Hasan Mushrif : मुश्रीफ घाटगेंवर पुन्हा बरसले; म्हणाले, हवा बदलल्याचं काहींना वाटतं, पण...

Hasan Mushrif on Samarjitsinh Ghatge : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर घाटगेंनी शरद पवारसाहेबांच्या 'NCP'त प्रवेश केला आहे. त्यानंतर घाटगे आणि मुश्रीफ यांच्यात शाब्दिक वॉर रंगलं आहे.
hasan mushrif |samarjitsinh ghatge
hasan mushrif |samarjitsinh ghatge sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News: समजितसिंह घाटगे यांनी 'तुतारी' हाती घेतल्यापासून ते मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निशाण्यावर आले आहेत. सोमवारी हसन मुश्रीफ यांनी समजितसिंह घाटगे यांचं नाव न घेता टीका केली आहे.

काही लोकांनी देवेंद्र फडणवीस यांचा गैरफायदा घेऊन त्यांचा विश्वासघात केला, असा घणाघात मुश्रीफ यांनी घाटगेंवर केला आहे. मी शरद पवारसाहेबांना सांगूनच पक्षाबाहेर पडलो, असा दावाही हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

अजितदादा पवार यांनी हसन मुश्रीफ यांची कागलमधून उमेदवारी जाहीर केल्यानंतर महायुतीत असलेले समजितसिंह घाटगे नाराज झाले होते. त्यानंतर घाटगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची भेट घेत भाजपला 'रामराम' ठोकणार असल्याचं जाहीर केलं होतं. अलीकडेच शरद पवारसाहेबांच्या उपस्थितीत घाटगे यांनी 'तुतारी' हाती घेतली आहे. यानंतर घाटगे आणि मुश्रीफ यांच्यात टीका-टिप्पणी होत आहे.

सोमवारी बाचणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रम कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मुश्रीफ यांनी घाटगेंना लक्ष्य केलं.

hasan mushrif |samarjitsinh ghatge
Kagal Constituency : कागलमधील घाटगे-मुश्रीफ लढतीत तिसऱ्या भिडूची एंट्री, निवडणुकीसाठी ठोकला शड्डू

"काही लोकांनी देवेंद्र फडणवीस यांचा गैरफायदा घेऊन त्यांचा विश्वासघात केला. मला सहा वेळा निवडून दिलं म्हणून आता हवा बदलली, असेल असं काहींना वाटतं. अशी हवा बघत राहाल, तर तुमचं वाटोळच होईल. भावनेच्या भरात जाऊ नका," असं मुश्रीफ यांनी घाटगेंना ठणकावून सांगितलं आहे.

hasan mushrif |samarjitsinh ghatge
Hasan Mushrif : सावध झालेल्या मुश्रीफांनी 'वस्तादा'वर टाकलेला प्रतिडाव उलटण्याचा धोका

यावेळी सत्तेत सहभागी झाल्यानंतर शरद पवारसाहेबांची विमानतळावर झालेल्या भेटीचा किस्सा मुश्रीफांनी सांगितला आहे. "शरद पवारसाहेबांची साथ सोडल्यानंतर आम्ही खासगी विमानाने मुंबईत आलो. मुंबईत खासगी विमानतळ हे वेगळं आहे. तिथे आम्ही चौघे बसलो होते. तेव्हा, शरद पवारसाहेब तिकडे आले. आम्ही सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला. पवारसाहेबांनी मला, 'कुठे आलात,' असं विचारलं. मी उत्तर दिल्यानंतर साहेबांनी, 'तुम्ही तर जनतेची परवानगी घेऊन आला ना,' असं म्हटलं," अशी आठवण मुश्रीफांनी सांगितली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com