Hatkanangale Lok Sabha controversy between two factions  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hatkanangale Lok Sabha Constituency : हातकणंगले मतदारसंघात कार्यकर्ते भिडले, दोन गटात हाणामारी, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मतदान सुरळीत !

Mahavikas Aghadi & Mahayuti News : महाविकास आघाडी चे उबाठा गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर आणि या मतदारसंघातून निवडणूक लढविणारे महायुती चे उमेदवार धैर्यशील माने यांच्या दोन गटात वादावादी झाली.

सरकारनामा ब्यूरो

Kolhapur News : पश्चिम महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान सुरू आहे. या मतदाना दरम्यान, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या वाळवा तालुक्यातील साखराळे गावातील मतदान केंद्रावर जोरदार राडा झाला. या मतदारसंघातून महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविणारे उमेदवार धैर्यशील माने यांचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांत हा राडा झाला. परिणामी या मतदान केंद्रातील मतदान काही काळासाठी बंद करावे लागले होते.

लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज मतदान होत आहे. राज्यातील अकरा मतदार संघाचे मतदान पार पडत असून यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघासह सातारा, कोल्हापूर मधील लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील साखराळे गावातील बूथ क्रमांक 62,63 मध्ये हा गोंधळ झाला.महाविकास आघाडी चे उबाठा गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर आणि या मतदारसंघातून निवडणूक लढविणारे महायुती चे उमेदवार धैर्यशील माने यांच्या दोन गटात वादावादी झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरात बाचाबाची आणि जोरदार हाणामारी झाली. मतदान केंद्र क्रमांक 62 आणि 63 वर सत्यजित पाटील सरूडकर यांचे बोगस प्रतिनिधी यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करत धैर्यशील माने यांच्या गटाने मतदान केंद्र काही काळ बंद ठेवले. यावरून महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. याचा जाब ते विचारण्यासाठी आले होते. त्यावेळी हा वाद झाला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे पहायला मिळाले.

या दोन्ही गटात शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर त्याचे रूपांतर वादावादी होऊन कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. या सर्व प्रकारामध्ये पोलिसांनी (Police) वेळेत हस्तक्षेप केला. त्यामुळे पुढील गोंधळ टळला. या प्रकाराची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया काही काळ बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर मतदान सुरू करण्यात आले आहे. सध्या या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. या प्रकारानंतर धर्यशील माने गटाचे दत्तात्रेय पाटील यांनी सत्यजित पाटील सरूडकर यांच्या बोगस प्रतिनिधीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT