Madha Lok Sabha : करमाळ्यात कांद्याने बटन दाबून शेतकऱ्याने केले मतदान; व्हिडिओ व्हायरल

Lok Sabha Election 2024 : केंद्र सरकारने ऐन हंगामात म्हणजेच डिसेंबरमध्ये कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केला होता. वास्तविक केंद्र सरकारने अगोदरच 30 डिसेंबरपर्यंत कांदा निर्यातीवरील बंदी उठवली होती. मात्र, आपलाच निर्णय फिरवत केंद्र सरकारने तेव्हा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच कांदा निर्यातबंदी लागू केली होती. त्याचा परिणाम बाजारभाव पडण्यावर झाला होता.
Karmala Voting
Karmala VotingSarkarnama

Solapur, 07 May : ऐन हंगामात केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा राग शेतकऱ्यांच्या मनात अजूनही धुसमसत असल्याचे दिसून येत आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले होते. तो राग कांदा उत्पादक शेतकरी मतदानाच्या माध्यमातून भाजपवर काढताना दिसत आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा तालुक्यातील एका मतदान केंद्रावर शेतकऱ्याने चक्क कांदाने बटण दाबून मतदान करत आपला रोष व्यक्त केल्याचे दिसून येते. कांदा बटन दाबून मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

केंद्र सरकारने (Central Government) ऐन हंगामात म्हणजेच डिसेंबरमध्ये कांदा निर्यातबंदीचा (Onion Export Ban) निर्णय जाहीर केला होता. वास्तविक केंद्र सरकारने अगोदरच ३० डिसेंबरपर्यंत कांदा निर्यातीवरील बंदी उठवली होती. मात्र, आपलाच निर्णय फिरवत केंद्र सरकारने तेव्हा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच कांदा निर्यातबंदी लागू केली होती. त्याचा परिणाम बाजारभाव पडण्यावर झाला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Karmala Voting
Lok Sabha Election voting 2024 : सकाळी 11पर्यंत सोलापुरात 16.17 तर माढ्यात 15.27 टक्के मतदान; फलटण-माळशिरसमध्ये चुरस

निर्यातबंदीच्या अगोदर ४० रुपये किलो असणारा कांदा थेट १२ ते १५ रुपये किलोंवर आला होता. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात त्या निर्णयामुळे अक्षरशः पाणी आणले होते. त्याचा राग अनेक भाजप नेत्यांना (BJP Leader) अनुभवावा लागला आहे. अनेक गावांत कांदावरून भाजप नेत्यांना जाब विचारण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या मनात तो राग अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Lok Sabha Constituency) करमाळा तालुक्यात आज सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळातच करमाळा तालुक्यातील एका गावातील शेतकऱ्याने चक्क कांद्याने बटण दाबून मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

संबंधित कांदा उत्पादक शेतकऱ्याने कांद्याने बटन दाबून आपला भाजप सरकारवरील राग व्यक्त केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात कांदा उत्पादक शेतकरी भाजपला रडवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Karmala Voting
Rohit Pawar News : मतदान केल्यानंतर रोहित पवारांचा अजितदादांवर मोठा आरोप; म्हणाले...

माढ्यात सकाळी अकरापर्यंत 15.27 टक्के मतदान

माढा लोकसभा मतदारसंघात फलटण आणि माळशिरस मतदारसंघात मतदानासाठी जोरदार चुरस दिसून येत आहे. या ठिकाणी काही पॉईंटचा फरक दिसून येत आहे. सर्वाधिक मतदान हे फलटणमध्ये झाले असून ते 18.54, तर माळशिरसमध्ये टक्के 18.48 टक्के एवढे मतदान झाले आहे.

माळशिरस आणि फलटणनंतर सर्वाधिक मतदान हे करमाळा तालुक्यात झाले असून ते 16.62% एवढे आहे, तर माढ्यात 12.90%, सांगोल्यात 14.20% तर माण मध्ये 11.04 एवढे मतदान झाले आहे. माढा लोकसभा मतदारसंघात 15.27 टक्के मतदान अकरा वाजेपर्यंत झाले आहे.

Karmala Voting
Osmanabad Lok Sabha Election 2024: अर्चनाताई पाटील, ओमराजे निंबाळकर यांनी केले मतदान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com