Suresh Narke, a Shiv Sena taluka deputy chief, was detained after he entered Kolhapur District Court with a licensed revolver, triggering a major security alert Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Court : शिवसेना तालुका उपप्रमुखाचा अजब कारनामा, थेट कमरेला रिव्हॉल्व्हर लावून न्यायालयात घुसला अन्...

Kolhapur court incident controversy : शिवसेनेचा हातकणंगले तालुका उपप्रमुख कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात थेट कमरेला रिव्हॉल्व्हर लावून घुसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिव्हॉल्व्हर लावून गेलेल्या सुरेश संभाजी नरके याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 15 Jul : शिवसेनेचा हातकणंगले तालुका उपप्रमुख कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात थेट कमरेला रिव्हॉल्व्हर लावून घुसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिव्हॉल्व्हर लावून गेलेल्या सुरेश संभाजी नरके (वय 42, रा. वठार तर्फ वडगाव, ता. हातकणंगले) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे.

शाहूपुरी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नरके यांच्याकडे शस्त्रपरवाना रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे तातडीने प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.

पोलिसांनी सांगितले की, सुरेश नरके हा एका शाळेत लिपिक म्हणून काम करतो. आज सकाळी तो मोकातील एका खटल्यात फिर्यादी म्हणून तिसऱ्या मजल्यावरील जिल्हा न्यायालयात हजर होण्यासाठी आला होता. जिल्हा न्यायाधीश तांबे न्यायालयात डायसवर हजर असताना पावणे बाराच्या सुमारास आल्यानंतर त्याच्या कंबरेला रिव्हॉल्व्हर होते.

याची माहिती मिळताच तेथे हजर असलेल्या पोलिसांनी न्यायालयात अग्निशस्त्र, जिवंत राउंड, ज्वालाग्राही पदार्थ घेऊन येण्यास बंदी असतानाही रिव्हॉल्व्हरसह न्यायालयात आल्याच्या कारणावरून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर जप्त केली. त्याच्याकडे अधिक माहिती घेतली असता तो पेठवडगाव येथील मोकाच्या आरोपातील फिर्यादी असल्याची माहिती पुढे आली.

नरके सकाळी घरातून निघून न्यायालयात दाखल झाला. त्याच्याकडे असलेली रिव्हॉल्व्हर मोटारसायकलवर कोठे ठेवणार? म्हणून त्याने ती कंबरेला ठेवून न्यायालयात प्रवेश केला. पोलिस कॉन्स्टेबल संजय पारळे यांनी त्याच्याविरोधात फिर्याद दिली.

पोलिसांनी नरकेकडील सुमारे दीड लाख रुपयांची काळसर रंगाची व चॉकलेटी रंगाची क्लिप असलेली रिव्हॉल्व्हर जप्त केली. न्यायालयात शस्त्र घेऊन प्रवेश करणे गुन्हा आहे याची माहिती असतानाही त्याने ती न्यायालयात जवळ बाळगली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. रात्री उशिरापर्यंत तो शाहूपुरी पोलिस ठाण्यात होता. त्याच्याकडे चौकशी सुरू होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT