Kolhapur: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तपोवन मैदानावर सभा झाली. पण काल रात्रीपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील (Hatkangale Lok Sabha 2024) रणनीती आखण्याबरोबरच राज्यातील इतर जागा वाटपाचे तिढे सोडवण्यासाठी सभेला जाण्यापर्यंत पंचशील हॉटेलमध्ये तळ ठोकला.
कोल्हापूर (Kolhapur Lok Sabha Constituency 2024) व हातकणंगले मतदारसंघातील हालचालींवर मुख्यमंत्री शिंदे (cm Eknath Shinde) लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्रीच अनेकांच्या भेटी घेतल्या. आमदार राजवर्धन कदमबांडे (Rajvardhan Kadambande), भाजप नेते समजीत घाटगे यांच्याशी ही चर्चा केली.
सभेच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांचे शुक्रवारी रात्रीच कोल्हापुरात आगमन झाले, एका हॉटेलमध्ये काही काळ थांबून त्यानंतर त्यांनी दोन्ही मतदारसंघांतील माहिती घेतली, त्यानंतर रात्री हातकणंगले मतदारसंघासाठी इस्लामपूरला जाऊन काहींच्या भेटी घेतल्याचे समजते. तिथून आल्यानंतर सकाळपासून ते हॉटेलमध्येच थांबून होते. सकाळी धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह काहींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
बहुतांशवेळ स्वतंत्र रूममध्ये बसून ठिकठिकाणी संपर्क सुरू होता. मुंबई उत्तर मध्य जागेवरील उमेदवारीची घोषणा व्हायची होती. त्यासाठीच त्यांचा बहुतांश वेळ गेल्याचे समजते. दुपारनंतर मंत्री उदय सामंत यांचे हॉटेलवर आगमन झाले. त्यावेळीही काही काळ भेट झाल्यानंतर ते स्वतंत्र रूममध्ये थांबून होते. दुपारी एकच्या सुमारास ते अंबाबाई दर्शनाला बाहेर पडून काहींच्या भेटी घेणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे अनेक कार्यकर्तें थांबून होते. मात्र ते प्रतीक्षा करत थांबले असले तरी, मुख्यमंत्री मात्र बाहेर पडले नाहीत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री रामदास आठवले आल्यानंतर त्यांची मुख्यमंत्र्यांशी एकत्रित चर्चा झाली. त्यावेळी आमदार विनय कोरे यांचेही आगमन झाले. तिथून साडेचारच्या सुमारास सर्वजण सभेसाठी बाहेर पडले. सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा पंचशील हॉटेलवर थांबले. रात्री उशिरापर्यंत मंत्री उदय सामंत, राजवर्धन कदमबंडे, समरजितसिंह घाटगे, राजेश क्षीरसागर, अमल महाडिक यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.