महाराष्ट्रात मराठा ( Maratha ) विरुद्ध ओबीसी ( Obc ) समाजात आरक्षणावरून असा वाद रंगला होता. हा वाद शांत झाला असतानाच सांगलीत ( Sangli ) ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या गाडीला अज्ञाताकडून चपलांचा हार घालण्यात आला आहे. तसेच, गाडीवर शाईफेक करण्यात आली आहे. 'मराठा समाजाच्या नादी लागू नका, नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही,' असा इशारा देणारे पत्रही गाडीवर लावण्यात आलं आहे.
प्रकाश शेंडगे ( Prakash Shendge ) हो ओबीसी बहुजन पक्षाकडून सांगली लोकसभेच्या ( Sangli Lok Sabha Constituency ) मैदानात उतरले आहेत. सांगलीतील हॉटेल ग्रेट मराठा समोर प्रकाश शेंडगे यांची कार उभी होती. यातच रात्री अज्ञातांकडून त्यांच्या कारवर शाईफेक करत चपलांचा हार घालण्यात आला. तसेच, एक पत्रकही कारवर लावत धमकी-वजा इशारा देण्यात आला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पत्रकात काय?
"प्रकाश शेंडगे तुला मराठा समाज ( Maratha Community ) पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही. भुजबळाने जशी नाशिकमध्ये माघार घेतली. तशी तू माघार घे आणि मराठ्यांच्या नादी लागू नका नाहीतर तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. मराठ्याला विरोध केला, तर पुढच्या वेळी चपलेला हार गळ्यात घालू. एक मराठा लाख मराठा," असं पत्रकात म्हटलं आहे.
याप्रकरणाबद्दल प्रकाश शेंडगे म्हणाले, "कवठेमहांकाळ येथे आमचे कार्यकर्ते प्रचार करताना मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी मज्जाव केला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध कायम आहे. मराठा विरुद्ध ओबीसी वाद मराठवाड्यात पेटला असताना सांगली शांत होती. आता उघडघड धमकी आणि इशारा मला देण्यात आला आहे. या महाराष्ट्रात काय चालू आहे?"
"निवडणूक मुक्त वातावरणात झाली पाहिजे. लोकशाही आहे. मते मागण्याचा अधिकार सर्वांना आहे. महाराष्ट्रात संविधान मान्य होणार नसेल, तर हा देश कसा चालणार आहे? पण, अशा घटनांमुळे विनाकारण सांगलीतील सामाजिक समतोल बिघडत चालला आहे. मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी ही निवडणूक शांततेत पार पाडावी, ही माझी विनंती आहे. कुठलाही वाद करण्याची आमची इच्छा नाही. आम्ही कुठल्याही समाजाला मते मागू शकतो. या घटनेची निवडणूक आयोग आणि पोलिसांत तक्रार करणार आहे," असं शेंडगेंनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.