Satara Bribe News
Satara Bribe News sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Bribe News : पंधराशे रूपयांची लाच घेताना दुय्यम निबंधकास पकडले

Umesh Bambare-Patil

Satara Bribe News : नोटीस ऑफ इंटिमेशनची पाच प्रकरणे मंजूर करून घेण्याकरता पंधराशे रुपयांची लाच Birbe स्वीकारताना सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग दोन यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याबाबतची अधिक माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक श्रीमती उज्वल वैद्य Ujjwala waidya यांनी दिली.

यासंदर्भातील अधिक माहिती अशी की, नोटीस ऑफ इंटिमेशन प्रकरणाकरिता तक्रारदाराने दुय्यम निबंधक वर्ग दोन उदय धनाजी सूर्यवंशी यांच्याकडे अर्ज केला होता. या पाच प्रकरणांना मंजुरी देण्याकरिता तीनशे रुपयेप्रत्येक प्रमाणे पंधराशे रुपयांच्या लाचेची मागणी त्याने केली होती.

या प्रकरणाची लेखी माहिती सातारा Satara लाचलुतपत प्रतिबंधक विभागाला Anti-Bribery Department तक्रारदाराने कळवली होती.त्यानुसार नऊ मे रोजी या प्रकरणाची पडताळणी करण्यात आली. श्री. सूर्यवंशी यांना त्यांच्या कार्यालयाच्या परिसरातच पंधराशे रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

त्यांना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत नलावडे व तुषार भोसले यांनी हा सापळा रचला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT