Prakash Abitkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prakash Abitkar : आरोग्यमंत्री आबिटकरांना त्यांच्या जिल्ह्यातच बोगस डॉक्टर, गर्भलिंग निदान रॅकेट मोडून काढण्याचे आव्हान!

Illegal Gender Test Racket in Kolhapur : कायद्याचीच भीती न उरल्याने उजळमाथ्याने असे बोगस डॉक्टर आणि गर्भलिंगलिदान करणारे हा प्रकार घडवून आणत आहेत.

Rahul Gadkar

Fake Doctors Racket in Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने गर्भलिंग निदान करणारे प्रकार समोर येत आहेत. तर दुसरीकडे शहरासह ग्रामीण भागात देखील बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढले आहे. सातत्याने होणाऱ्या या प्रकारामुळे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनाच अशा डॉक्टरांकडून खुले आव्हान दिले जात आहे. आरोग्य मंत्री झाल्यापासून जिल्ह्यात गर्भलिंग निदान करणारे दोन प्रकार उघडकीस आले होते.

याला आळा घातण्यासाठी आरोग्यमंत्री आबिटकर यांनी कडक पावले उचलली असली तरी अशा डॉक्टरांकडून यांच्या या कारवाईला भीक घालत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान पोलीस प्रशासनातील तपासणीच्या उणीवा आणि कायद्याचा धाक नसल्यानेच वारंवार असले प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. शिवाय लोकांच्या मानसिकतेत ही बदल करण्याचे मोठे आव्हान आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांच्यापुढे आहे.

मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असल्याने गर्भलिंग निदान करून गर्भपात करण्याविरोधात कडक पावले उचलण्यात आले. बदलत्या काळानुसार पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आल्यानंतर गावोगावी ही यंत्रणा पुन्हा सक्रिय झाली. लोकांना वंशाला दिवा हवा तर डॉक्टरांना पैसा हवा, या दृष्टिकोनातूनच गर्भपात करणाऱ्यांची संख्या अधिक वाढली. अशा डॉक्टरांना राजकीय आश्रय मिळत असल्याने जिल्ह्यात ही यंत्रणा फोफावली होती.

मात्र अलीकडच्या काळात सातत्याने कारवाई होत असल्याने छुप्या पद्धतीने गर्भलिंग निदान सुरू असल्याची माहिती देखील समोर येत होती. सापडल्यानंतर न्यायालयात साक्षीपुरावे देखील योग्य मिळत नसल्याने सहज सुटण्याचा पर्याय अशा डॉक्टरांपुढे उपलब्ध होत होता. त्यामुळे कायद्याचा धाक देखील अशा डॉक्टरांना उरलेला नाही. तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील बोगस डिग्रीच्या नावाखाली दवाखाना उघडून देण्याचे प्रकार उघडकीस आले होते.

गर्भलिंग निदान आणि बोगस डॉक्टरकीच्या माध्यमातून कोट्यावधींच्या उलाढाली सुरू आहेत. गर्भपात करण्यासाठी 30000 पासून ते एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम मोजली जात आहे. शिवाय बोगस डॉक्टरांकडून अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यावर आळा घालण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र कायद्याचीच भीती न उरल्याने उजळमाथ्याने असे बोगस डॉक्टर आणि गर्भलिंगलिदान करणारे हा प्रकार घडवून आणत आहेत. बोगस डॉक्टरांकडून काही वेळा गर्भपात करणाऱ्या गोळ्या देखील पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे.

गेल्या तीन महिन्यात कोल्हापुरात दोन वेळा मोठ्या कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापुरातील फुलेवाडी, क्रांतीसिंह नाना पाटील नगर तर दोन दिवसांपूर्वी कळंबा येथे गर्भपात करणाऱ्यांवर जिल्हा आरोग्य विभाग आणि पोलीस पथकांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. मात्र अशा डॉक्टरांना गर्भपातीच्या गोळ्या कोठून उपलब्ध होतात याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचे धागेदोरे आणखी उघड होऊ शकतात.

सक्षमपणे पोलीस कारवाई करत असताना व्यक्ती आणि साक्षी पुरावा गोळा करताना पोलिसांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. अशावेळी कडक शासन होणे अपेक्षित आहे. त्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच वारंवार अशी प्रकरण समोरीत असतील तर ते मोडून काढण्यासाठी मोठे आव्हान मंत्री अबीटकर यांच्यासमोर आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT