Jayant Patil Politics Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil : उरण ईश्वरपूर निवडणुकीला धक्कादायक वळण; जयंत पाटील गटाकडून महायुती उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी?

Uran Ishwar Municipal Election : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आता आपल्या मतदार संघात उतरून उरण ईश्वर नगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी केली आहे.

Rahul Gadkar

  1. उरण ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील विरुद्ध महायुती अशी टोकाची लढत सुरू आहे.

  2. प्रचारादरम्यान महायुतीच्या उमेदवाराला जयंत पाटील गटाकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  3. या प्रकरणात महायुतीने ईश्वरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

Uran Ishwar : सांगली जिल्ह्यातील अत्यंत अटीतटीच्या समजल्या जाणाऱ्या उरण ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीत टोकाची इर्षा पाहायला मिळत आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील विरुद्ध महायुती अशी लढत होत असताना प्रचारादरम्यान तणाव निर्माण झाल्याची घटना घडली आहे. महायुतीच्या उमेदवाराला आमदार जयंत पाटील यांच्या गटाच्या उमेदवाराकडून थेट जीवे मारण्याचे धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. यासंदर्भात महायुती आक्रमक होत याबाबचे निवेदन ईश्वरपूर पोलीस ठाण्याला दिले आहे.

महायुतीकडून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उरूण ईश्वरपूर नगरपरिषदेची निवडपूक सुरू आहे. या निवडणूकीमध्ये महायुतीच्या वतीने प्रभाग क्र.3 अ मध्ये सौ. गीता महेंदर सोनार - बेलवणकर आणि प्रभाग 3 ब मध्ये व श्री. शकील आदम सय्यद असे दोन उमेदवार निवडणूक लढवत आहे. आम्ही दोन्हीही उमेदवार अल्पसंख्यांक समाजातील असून सर्वसामान्य आहे.

आमच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खंडेराव जाधव हे उमेदवार आहेत. त्यांची मुळातच गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. ते व त्याचे पुतणे सागर जाधव हे गेले काही दिवस आमच्या पाठीमागे फिरणे, लोकांचा घोळकाकरून अर्वाच्च भाषेत टिका टिप्पणी करणे असे वर्तन करत आहेत.

आज सकाळी आम्ही महायुतीचे दोन्ही उमेदवार राजारामनगर परिसरामध्ये घरोघरी भेटी देत असताना भाग्यश्री जाधव यांच्या घरालगतचा असल्याने त्याठिकाणी केवळ आकसापोटी व अल्पसंख्यांक समाजातील लोक असल्याने तुच्छ भावनेने खंडेराव जाधव व सागर जाधव व अनोळखी आठ ते दहा लोकांच्या टोळक्याने त्यांची अडवणूक करत माझ्या हातामध्ये असलेले महायुतीचे पत्रके हिसकावून घेवून भिरकावले व मला जातीवाचक शब्दांमध्ये धमकी दिली.

तसेच माझ्या सहकार उमेदवार सौ.गीता महेंद्र सोनार बेलवणकर या निनाई नगर परिसरातील प्रकल्पग्रस्त व अल्पसंख्यांक सोनार समाजाचे आहेत.असे असताना त्यांनाही त्यांच्या जातीवरून शिवीगाळ करत अशा पद्दतीने धमक्या देत मनमानी पद्धतीने खंडेराव जाधव यांचा कारभार सुरू आहे.

निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये ही वर्तणूक अशोभनीय आहे. सदर प्रभागाची निवडणूक रद्द करावी. अन्यथा महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना पोलिस सरंक्षण द्यावे.अशी आमची मागणी आहे. तसेच संबंधीत उमेदवार व त्यांच्या साथीदारांच्या वर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून तडीपारीची कारवाई करण्यात यावी.

FAQs :

1. उरण ईश्वर नगरपालिका निवडणुकीत तणाव का वाढला?
कारण प्रचारादरम्यान महायुतीच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप झाला.

2. धमकी देण्याचा आरोप कोणावर आहे?
आमदार जयंत पाटील यांच्या गटातील उमेदवारावर.

3. महायुतीने काय कारवाई केली?
महायुतीने या प्रकरणाची ईश्वरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

4. हा वाद कोणत्या पक्षांमध्ये झाला?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि महायुती यांच्यात.

5. या प्रकरणाचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
राजकीय तापमान वाढण्याची, तणाव वाढण्याची आणि निवडणुकीतील वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT