raju shetti satyajit patil sarudkar dhairysheel mane  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satyajit Patil Sarudkar : विनय कोरे यांच्या बालेकिल्ल्यात सत्यजित पाटलांची कसोटी, शाहुवाडीत 'मशाल' उजळणार?

Hatkanangle Lok Sabha 2024 Results : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सरूडकर तर, महायुतीकडून खासदार धैर्यशील माने निवडणुकीच्या रिंगणात आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या लढतीमुळे या मतदारसंघातील निवडणूक तिरंगी बनली आहे.

Rahul Gadkar

Hatkanangle Lok Sabha Election : हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांची शाहूवाडीतच खरी कसोटी आहे. शाहूवाडीचे प्रतिनिधित्व केलेल्या सत्यजित पाटील सरूडकर यांच्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तेवढेच मोठे आव्हान आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मानणारा प्रचंड वर्ग शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यात आहे. शिवाय विद्यमान आमदार विनय कोरे यांचा बालेकिल्ला म्हणून पन्हाळा शाहूवाडी हा मतदारसंघात मताधिक्य मिळवण्याची खरी कसोटी सत्यजित पाटील सरूडकर यांच्यासमोर आहे. यासर्व आव्हानावर मात करून शाहूवाडीत मताधिक्य घेऊन सत्यजित आबा सरूडकर 'मशाल' पेटवणार का? हे अवघ्या काही वेळातच कळेल.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सरूडकर तर, महायुतीकडून खासदार धैर्यशील माने निवडणुकीच्या रिंगणात आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या लढतीमुळे या मतदारसंघातील निवडणूक तिरंगी बनली आहे.

खासदार माने यांच्याकडे व्यक्तिगत गट पॉवर नसल्याने त्यांची संपूर्ण महायुतीतील सर्व नेत्यावर मदार आहे. पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघात विद्यमान आमदार विनय कोरे यांच्यावर मताधिक्य देण्याचे जबाबदारी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी सोपवली आहे. मात्र माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर त्यांनी याच मतदारसंघातून विनय कोरे यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात दोघांचीही समतोल ताकद निर्माण झाली आहे.

भाजपचे (BJP) उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या बाबतीत असलेली नाराजी विद्यमान आमदार विनय कोरे यांची विधानसभेतील अडचण दूर होण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला गुप्तपणे मदत केल्याचे जाहीरपणे सांगितले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवाय मागील लोकसभा निवडणुकीत पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी घेतलेलं मताधिक्य तितकेच महत्त्वाचे आहे. या तिरंगी लढतीत खासदार धैर्यशील माने यांना मताधिक्य मिळणे , अशक्य असल्याचे सांगितले जाते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि सत्यजित पाटील सरूडकर यांच्यातच या विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळवण्याची चुरस आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT