Raju Shetti: डोळ्यात तेल घालून बघा, बॅलेट पेपरवर लक्ष द्या, खातरजमा करा!

Hatkanangale Lok Sabha Constituency 2024: प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मतमोजणी वेळेचे मतदान याकडे देखील बारकाईने लक्ष ठेवा. त्यामध्ये फेरफार आढळल्यास तात्काळ हरकत घ्या अशा सक्त सूचना, राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
Hatkanangale Lok Sabha Constituency 2024
Hatkanangale Lok Sabha Constituency 2024Sarkarnama

kolhapur: लोकसभेच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चांगलीच तयारी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkanangale Lok Sabha 2024) निवडणुकीला सामोरे गेले आहेत.

महाविकास आघाडीतून लढण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केल्यानंतर या मतदारसंघात माजी खासदार राजू शेट्टी, महायुतीचे खासदार धैर्यशील माने, महाविकास आघाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली.

जातीय समीकरणे आणि मत विभाजनाचा प्रमुख फॅक्टर हाच या मतदारसंघाचा खासदार ठरवणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उद्या होणाऱ्या निकालाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

उद्या होणारी मतमोजणी मतदारसंघात नसल्याने त्यांना कोल्हापूर मतदारसंघात जावे लागणार आहे. त्या दृष्टीनेच स्वाभिमानी ने तयारी केली असून 84 मतमोजणी प्रतिनिधींना आज विशेष सूचना देण्यात आले आहेत.

आज सायंकाळी सहा वाजता उचगाव येथील सरस्वती हॉल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा आणि 84 मतमोजणी प्रतिनिधींचा मेळावा होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याकडून कार्यकर्त्यांना विशेष सूचना देण्यात आले आहेत. उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी 84 मतमोजणी प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना सूचना देता वेळी डोळ्यात तेल घालून प्रत्येक मतमोजणीकडे लक्ष द्या. बॅलेट पेपर मोजत असताना त्यावर बारीक लक्ष ठेवा. प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मतमोजणी वेळेचे मतदान याकडे देखील बारकाईने लक्ष ठेवा. त्यामध्ये फेरफार आढळल्यास तात्काळ हरकत घ्या अशा सक्त सूचना, राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

मुक्कामाची सोय, बूथनिहाय आकडेवारी

हातकलंगले लोकसभा मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ आणि सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. शिवाय उद्या होणारी मतमोजणी ही कोल्हापूर शहरात नजीक असणाऱ्या राजाराम तलाव येथे होणार असल्याने कार्यकर्त्यांची कोणतीच गैरसोय होऊ नये याची काळजी स्वाभिमाने शेतकरी संघटनेने घेतली आहे.

Hatkanangale Lok Sabha Constituency 2024
Kolhapur Lok Sabha 2024: काउंटडाऊन सुरू...; कार्यकर्त्यांची घालमेल अन् उमेदवारांचे देव पाण्यात

खातरजमा करा

इस्लामपूर, शिराळा, शिरोळ मधून प्रतिनिधी येणार असल्याने त्यांच्या मुक्कामाची सोय करण्यात आली आहे. शिवाय मतदाना दिवशी झालेल्या बूथनिहाय मतदानाची आकडेवारीचे रेकॉर्ड प्रत्येक प्रतिनिधी जवळ देण्यात आली आहे. त्यानुसारच मत मिळाले आहेत का? याची खातरजमा प्रतिनिधींनी करावी. जर त्यात दोष आढळून आल्यास तात्काळ हरकत घ्यावी अशा सक्त सूचना शेट्टी यांनी दिल्या आहेत.

आज कार्यकर्त्यांचा मेळावा

उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आज मेळावा उचगाव येथील सरस्वती हॉल येथे होणार आहे. मेळाव्यात मतमोजणी प्रतिनिधींना विशेष सूचना देण्यात येणार आहेत. या मेळाव्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित असणार आहेत.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com