Dahiwadi Dhangar Community Andolan sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maan News : आरक्षण मिळेपर्यंत उपोषण; दहिवडीत धनगर समाजाच्या उपोषणास सुरुवात

Umesh Bambare-Patil

-रूपेश कदम

Dahiwadi News : जोपर्यंत मिळत नाही धनगर आरक्षण तोपर्यंत सोडणार नाही बेमुदत उपोषण, असा निर्धार करत धनगर समाजास लागू असलेल्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सकल धनगर समाज माण-खटाव यांच्या वतीने आज दहिवडीत बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली.

आज माण Maan Taluka तहसील कार्यालयासमोर वैभव गोरड, शरद गोरड, नितीन कटरे व सुरेश गोरड हे सकल धनगर समाजाच्या वतीने Dhangar Community विविध मागण्या घेऊन उपोषणास बसले आहेत. त्यांनी दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण तत्काळ मंजूर करावे व त्याची अंमलबजावणी करावी.

समाजातील मेंढपाळ बांधवांवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी त्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे व हल्ले करणारांवरती कठोर कारवाई करावी. धनगर समाजासाठी १००० कोटी रुपयांचा निधी देण्याच्या केलेल्या घोषणेची प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्यासंदर्भातचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र सरकारला तत्काळ पाठवावा. मेंढ्या चराईसाठी राखीव कुरणे ठेवावीत. तालुकास्तरावर लोकर खरेदी केंद्र उभारावीत.

राजे यशवंतराव होळकर परकुल योजना व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महामेष योजनेचा लाभ लाभार्थ्यांना त्वरित वितरीत करावा. माण व खटाव तालुक्यांतील राजे यशवंतराव होळकर घरकुल योजनेचे लाभार्थी व महामेष योजनेच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करावी.

आज या उपोषणस्थळी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेसुद्धा पाठिंबा दिला. तसेच प्रशासनाच्या वतीने तहसीलदार विकास अहिर यांनी उपोषणकर्त्यांना भेट देऊन माहिती घेतली.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT