Hasan mushrif
Hasan mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नगरच्या पालकमंत्री बदलाची मीही वाट पाहतोय

Amit Awari

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा हा राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा समजला जातो. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांच्याकडे या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत. कोल्हापूर राष्ट्रवादीची सर्वधुरा त्यांच्या खांद्यावर आहे. आगामी निवडणुका पाहता त्यांनी अहमदनगरचे पालकमंत्रीपद नको, असे पक्ष श्रेष्ठींना कळविले होते. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद बदलण्याच्या हलचालींना वेग आला आहे. या संदर्भात हसन मुश्रीफ यांनी आज महत्त्वपूर्ण वक्त केले. I am also waiting for the change of Guardian Minister of the town

अहमदनगर जिल्हा नियोजन समितीची सभा आज ऑनलाईन पद्धतीने झाली. यात पालकमंत्री हसन मुश्रीफ ऑनलाईन सहभागी झाले. त्यानंतर आयोजित ऑनलाईन पत्रकार परिषदेत पत्रकारांनी पालकमंत्री बदला बाबत विचारले असता मुश्रीफ म्हणाले, माझ्याकडे पक्षाने कोल्हापूरची जबाबदारी दिली आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्याचेही पालकमंत्रीपद माझ्याकडे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे मीच पक्षश्रेष्ठींकडे तीन-चार महिन्यांपूर्वी पालकमंत्रीपद बदलण्याची मागणी केली होती.

ते पुढे म्हणाले की, सध्या तरी मीच अहमदनगर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. पालकमंत्री बदलाची मीही वाट पाहतोय. पालकमंत्रीपद राहिलच तर 26 जानेवारीला ध्वजारोहण कार्यक्रमाला हजर राहील. पालकमंत्रीपदी नाही राहिलो तरीही जिल्ह्यात तुम्हा लोकांना भेटायला येईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

तनपुरेंचे नाव आघाडीवर

अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. त्यामुळे पालकमंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रीच असणार हे स्पष्ट आहे. या पदासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व ऊर्जा व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव चर्चेत आघाडीवर आहे. वळसे पाटलांना अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषविण्याचा अनुभव आहे. तर प्राजक्त तनपुरे हे पहिल्यांदाच आमदार व मंत्री झाले आहेत. तरीही वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपदाचे कामकाज असल्याने तनपुरे यांना संधी मिळू शकते अशी चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT