Eknath Shinde-Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना पुन्हा डिवचले; ‘मी डॉक्टर नाही; पण राजकीय ऑपरेशन सहजपणे करतो’

Political Operation Issue : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःला मोठी राजकीय ऑपरेशन करणारा म्हणत शिवसेनेच्या फुटीचा उल्लेख केला. या वक्तव्यातून त्यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले.

सरकारनामा ब्यूरो
  1. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फुटीबाबत पुन्हा एकदा सूचक भाष्य करत स्वतःला "राजकीय ऑपरेशन" करणारा नेता म्हणून संबोधून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

  2. महाबळेश्वरमध्ये विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, ज्यामुळे पक्षाची ताकद वाढल्याचा दावा शिंदेंनी केला.

  3. शिंदे यांनी विकासकामांचा धडाका, आगामी निवडणुकांचे महत्त्व आणि भगवा फडकवण्याचे आवाहन करत महाबळेश्वर आणि जिल्ह्यासाठी निधीअभाव होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले.

Satara, 16 November : मी व्यवसायाने डॉक्टर नाही; पण छोटी-मोठी राजकीय ऑपरेशन मी अगदी सहज करून टाकतो. महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं सर्वांत मोठं ऑपरेशन मी काही वर्षांपूर्वी यशस्वीपणे केलं आहे, असं सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फुटीबाबत पुन्हा एकदा भाष्य करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचले आहे.

महाबळेश्वर येथील विविध राजकीय पक्षांतील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्या प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बोलत होते. त्या वेळी त्यांनी शिवसेनेच्या फुटीबाबत केलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चेंना उधाण आले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महायुती सरकारच्या (Mahayuti Government) माध्यमातून लोकाभिमुख विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे इतर पक्षांमधील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामळे पक्षाची ताकद वाढली असून, महाबळेश्वरमध्ये भगवा नक्कीच फडकेल.

महाबळेश्वरमधील अनेक विकासकामांना माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात गती मिळाली आहे. जिल्ह्याच्या विकास कामांमध्ये यापुढेही सरकार कोणतीही कसर ठेवणार नाही. माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्याचे काम मी नक्कीच करेन. या भागातील विकासासाठी कुठेही पैशांची कमतरता भासू देणार नाही, असा शब्दही एकनाथ शिंदेंनी दिला.

आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सर्वांनी एकजुटीने पुढील लढाईत उतरून भगवा फडकवण्याचे काम करावे, असे आवाहनही शिंदे यांनी केले.

या वेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले, विधानसभा प्रमुख बबन शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी सुभाष कारंडे, यशराज भोसले, संजय मोरे, अजित सकपाळ, लक्ष्मी मालुसरे, संगीता गोंदकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

1. एकनाथ शिंदेंनी कोणत्या विषयावर पुन्हा भाष्य केले?

शिवसेनेच्या फुटीबाबत स्वतःला यशस्वी "राजकीय ऑपरेटर" म्हणत त्यांनी पुन्हा भाष्य केले.

2. महाबळेश्वरमध्ये काय महत्त्वाची घडामोड झाली?

विविध पक्षांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

3. शिंदेंनी विकासकामांबाबत कोणती हमी दिली?

महाबळेश्वर आणि जिल्ह्यातील विकासकामांसाठी कुठेही पैशांची कमतरता भासू देणार नाही, अशी हमी दिली.

4. आगामी निवडणुकांबाबत शिंदेंनी काय आवाहन केले?

सर्वांनी एकजुटीने लढून भगवा फडकवण्याचे आवाहन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT