Maharashtra election 2025: ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदे अन् अजितदादांना भाजपने जेरीस आणले; ही रणनाती ठरू शकते मास्टरस्ट्रोक...

Maharashtra election strategy News : भाजपच्या तुलनेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत व अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कमी प्रमाणात प्रवेश होत असल्याने सध्या हे दोन्ही पक्ष बॅकफूटवर दिसत आहेत.
Mahayuti Government
Mahayuti GovernmentSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील 244 नगरपालिका व 44 नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरु होत आहे. त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या होत्या. आता जवळपास नऊ वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला मुहुर्त मिळाला आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील भाजपमध्ये इतर पक्षातून जोरदार इन्कमिंग होत आहे. त्यामुळे भाजपच्या तुलनेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत व अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कमी प्रमाणात प्रवेश होत असल्याने सध्या हे दोन्ही पक्ष बॅकफूटवर दिसत आहेत.

त्याशिवाय भाजपकडून काही ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेला तर काही ठिकाणी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जुळवून घेत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा फॉर्म्युला वापरायचा असल्याने यामुळे भाजप सेफझोनमध्ये आहे तर इतर दोन्ही पक्षांत मात्र अस्वस्थता दिसत आहे.

गेल्या दोन दिवसातील राज्यभरातील हालचाली बघितल्यातर डोंबिवलीत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्क्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमा दरम्यान शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे नगरसेवक पदाधिकारी यांना भाजपमध्ये घेतल्याने शिवसेना शिंदे गटाने थेट भाजप प्रदेशाध्यक्षांवर हल्लाबोल केला आहे. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी युतीला तिलांजली दिली. ते युती धर्म पाळत नाहीत. युती नको असेल तर स्पष्ट सांगा, असा थेट निशाणा शिंदे गटाकडून रविंद्र चव्हाण यांच्यावर साधण्यात आला आहे.

Mahayuti Government
BJP Politics: छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात येवल्यात भाजप पत्ते ओपन करेना! डाव कोण जिंकणार?

भाजप (Bjp) प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळयात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे अनेक नगरसेवक पदाधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या ठिकाणच्या भाजपच्या भूमिकेमुळे शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजी पसरली आहे. दुसरीकडे काही पक्षप्रवेश रात्रीतून या ठिकाणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी रोखले. अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेला या ठिकाणी मोठा फटका बसला असता. मात्र, रात्रीतून काही वेगवान हालचाली झाल्याने काही प्रवेश रोखण्यात शिंदे यांच्या शिवसेनेला यश आले.

Mahayuti Government
Shivsena Politics: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात विजय करंजकर हेच सबकुछ; महायुतीची वाट न पाहताच स्वबळावर जाहीर केली नगराध्यक्षांची उमेदवारी !

महायुतीमध्ये मित्रपक्षातील नेत्यांना विचारणा केल्याशिवाय प्रवेश द्यायचा नाही, असे ठरले होते. मात्र महायुतीतील घटक पक्षातील नगरसेवक पदाधिकारी यांना फोडले जात आहे. त्यामुळे गेल्या एकही दिवसापासून भाजप व शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून या दोन्ही पक्षात इन्कमिंगवरून चुरस आहे.

Mahayuti Government
Tanaji Sawant VS NCP : 'मला वाटतं ते बोलतो, राष्ट्रवादीच्या औलादी...', तानाजी सावंतांचे वादग्रस्त वक्तव्य; महायुतीमध्ये फूट?

महायुतीबाबत प्रश्नचिन्ह

गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीतील विशेषतः काँग्रेस आणि इतर पक्षांतील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात असताना, महायुतीतील घटक पक्षांना विश्वासात घेतले जात नाही, अशी भावना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षातील नेटमंडळीत निर्माण झाली आहे. यातूनच येत्या काळात अंतर्गत संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती म्हणून काम करीत असताना संघर्ष टाळण्याचे आव्हान महायुतीमधील तीन पक्षासमोर आहे.

Mahayuti Government
Congress News : पृथ्वीराज चव्हाणांना निकटवर्तीयाने दाखविला कात्रजचा घाट; काँग्रेसचा राजीनामा, भाजपप्रवेश निश्चित

राजकीय समीकरण बदलणार?

भाजपकडे गेल्या एकही दिवसापासून जोरदार इनकमिंगमुळे शिंदे आणि अजित पवार यांची 'बार्गेनिंग पॉवर' कमी झाली असून, त्यांना जागावाटपात तडजोड करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात निवडणुकीपूर्वी जागावाटप करत असताना सध्याच्या राजकीय परिस्थिती व घडामोडींवरून, भाजपने आगामी निवडणुकांसाठी सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले स्थान मजबूत करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे मित्रपक्षांसमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.

Mahayuti Government
BJP Vivek Kolhe Vs NCP : भूलथापा देत आमदारकी काढली, आता नाही..; पालिका निवडणुकांसाठी भाजपच्या विवेक कोल्हेंनी भरला दम

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com