-सल्लाउद्दीन चोपदार
Maan News : राज्यातील भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षाची नियतच चांगली नाही, त्यामुळे मी कोणत्याच पक्षावर अवलंबुन नाही तर मी माझा स्वत:चा पक्ष राज्यासह देशात वाढवण्यासाठी फिरत असुन मी देखील देशाचा पंतप्रधान होणारअसुन मी कोणाकडे तिकीटाची भीक मागणारा नाही तर मी तिकीट देणारा नेता आहे, असा ठाम विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी म्हसवड येथे जनस्वराज्य यात्रेत माध्यमाशी संवाद साधताना व्यक्त केला.
श्री. जानकर Mahadev Jankar म्हणाले, लोकसभेच्या ४८ जागा नव्हे तर ५४३ जागा मी लढवणार असुन त्यासाठी संपूर्ण देशातील जनता माझ्या पाठीशी आहे. गुजरातसह Gujrat महाराष्ट्रात माझ्या रासप RSP पक्षाचा माढा लोकसभा मतदारसंघातून जनसुराज्य यात्रेचा झंझावात सुरु केला आहे. मी देशातील चार राज्यात रासप राजकारणात कार्यरत मी देखील राज्यात व देशात पक्ष वाढीचे काम जोमात करीत असुन या कामाला चांगले यश मला मिळत आहे.
संपूर्ण देशभरात या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. आगामी होणारी लोकसभा निवडणुक मी स्वत: लढवणार असुन त्यासाठी माढा, बारामती, परभणी आदीपैकी एक ठिकाणी माझी उमेदवारी निश्चित असणार आहे. तर गुजरात मधूनही मी लोकसभेसाठी उभा राहणार आहे. त्यासाठी मिर्जापुर मतदारसंघात मोर्चेबांधणी झालेली आहे. सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन याबाबत मी निर्णय घेणार आहे.
राज्यातील राजकारण हे अतिशय अस्थिर बनले असल्याचेही जानकर यांनी सांगितले. राज्यातील सत्तेत सर्वच विरोधी पक्ष जात असल्याने घटक पक्षांना आता सत्तेत स्थान मिळणार का, या प्रश्नावर बोलताना श्री. जानकर म्हणाले, सत्तेत वाटा मागताना आपले नगरसेवक किती, जिल्हा परिषद सदस्य किती आमदार किती, खासदार किती हे तपासणे महत्वाचे आहे.
त्यासाठीच मी पक्षाची ताकत वाढवण्याचे काम करीत असुन अगोदर या पक्षाचे नगरसेवक, आमदार, खासदार जास्तीत जास्त कसे निवडुन येतील यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी सर्वसामान्य जनता मला मोलाचे सहकार्य करीत आहे. मी कोणत्याही पक्षावर अवलंबुन नसुन सर्वसामान्य जनतेच्या सहयोगावर अन् त्यांच्या शक्तीवर माझा पक्ष वाढवत आहे. त्यासाठीच मी राज्यभर कार्यकर्त्यांच्या भेटी सुरु केल्या आहेत. आज माढा लोकसभा मतदार संघ मी पिंजुन काढणार आहे.
श्री. जानकर यांनी माढा लोकसभा मतदार संघात शेकडो वाहनांची रँली काढत कार्यकर्त्यांच्या भेटी - गाठी सुरु केल्या असुन त्यांचा हा झंझावात पाहुन सर्वसामान्य जनता त्यांनाच आता आपले दैवत मानु लागल्याचे चित्र आहे. म्हसवड शहरात त्यांच्या वाहनांचा ताफा आला असता माजी नगराध्यक्ष तुषार विरकर यांनी त्यांचे फटाक्यांच्या आतीषबाजीत जोरदार स्वागत केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.