BJP Demand Of Abdul Sattar Resign : शिंदे गटाचे नेते व मंत्री सत्तारांच्या अडचणी वाढल्या; मित्रपक्षानेच केली राजीनाम्याची मागणी

Marathwada Politics : '' राज्यात आम्ही सत्तेत सोबत असलो तरीही...''
Abdul Sattar
Abdul SattarSarkarnama
Published on
Updated on

Chhartrapati SambhajiNagar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्षात शरद पवार व अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. यानंतर अजितदादांच्या गटाने थेट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अजित पवार यांच्या सत्तेतील एन्ट्रीनं आधीच शिंदे गटात काही प्रमाणात अस्वस्थता आहे. याचदरम्यान, आता भाजपचे कार्यकर्ते हे शिंदे गटातील मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

राज्याचे कृषिमंत्री व शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या अडचणी काही केल्या थांबायचं नाव घेताना दिसत नाही. यापूर्वी वादग्रस्त विधानं, गैरव्यवहारांच्या आरोपामुळे अनेकदा अडचणीत आलेल्या सत्तारांसमोर नवीन संकट उभं राहिलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथे भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.

Abdul Sattar
Sanjay Shirsat Ministership News : जिल्ह्याला शिरसाटांच्या रुपाने शिवसेनेचा तिसरा मंत्री मिळणार..

छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar) येथे क्रांती चौकात सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन अर्धनग्न आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजपसह सामाजिक कार्यकर्त्यांकडून सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे.

भाजप कार्यकर्ते काय म्हणाले...?

भाजप कार्यकर्ते म्हणाले, राज्यात आम्ही सत्तेत सोबत असलो तरीही आमचा सिल्लोड तालुका कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यामुळे त्रस्त आहे. त्यामुळे आम्ही सत्तार यांच्यासारख्या अन्याय मंत्र्यांच्या विरोधात आम्ही लढत राहणार आहोत. कारण अन्यायाविरोधात लढण्याची आम्हांला शिकवण मिळाली आहे.

आंदोलकांचं नेमकं म्हणणं काय ?

सामाजिक कार्यकर्ते व भाजप(BJP)नेत्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. यावेळी आंदोलक म्हणाले, राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचार करणारा कोणी मंत्री असेल तर ते अब्दुल सत्तार आहेत. सत्तार मंत्री झाल्यापासून त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु केला आहे. त्यामुळे त्यांचा तत्काळ राजीनामा घेण्यात यावा. गोरगरीब यांच्या जमिनी हडपणे, वाळू तस्करी करणे, जमीन न दिल्यास बळजबरीने जमीन हडपण्याचे काम सत्तार यांनी केला असल्याचा आरोपही आंदोलकांनी यावेळी सत्तारांवर केला आहे.

Abdul Sattar
BRS-BJP News : ड्रेनेज लाईनच्या वादातून आमदार बंब, माने समर्थक भिडले..

शिरसाटांच्या रुपाने शिवसेनेचा तिसरा मंत्री मिळणार..

शिंदे फडणवीस सरकारमध्ये सध्या संदीपान भुमरे हे रोजगार हमी व फलोत्पादन, तर अब्दुल सत्तार हे कृषीमंत्री म्हणून कार्यरत आहेत. भुमरे यांच्याकडे तर जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे. आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहता संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना राज्यमंत्रीपद देत ताकद देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून होण्याची दाट शक्यता आहे.सत्तार, भुमरेंपैकी कुणाचे मंत्रिपद जाण्याची शक्यता नसली तरी जिल्ह्याला शिरसाट यांच्या रुपाने शिवसेनेचा तिसरा मंत्री मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com