Mahadev Jankar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Phaltan News : आत्महत्या करेन पण, इतर कुठल्याही पक्षातून आमदार, खासदार होणार नाही... जानकर

Mahadev Jankar पंढरपूर येथून आमदार महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या 'जन स्वराज र्यालीचा' समारोप फलटण येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते.

Umesh Bambare-Patil

-किरण बोळे

Mahadev Jankar News : फुलेवादाचा विचार घेवून राष्ट्रीय समाज पक्षाची वाटचाल सुरु आहे. उपेक्षितांना अपेक्षित ठिकाणी जाता याव हे आमचे ध्येय आहे. आजवर जनतेला भुलविण्याचे काम करणारे काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपला आता थारा न देता जनतेने रासपला मतांचे पाठबळ द्यावे, असे आवाहन करून मी एकवेळ आत्महत्या करेन पण, अन्य कुठल्याही पक्षातून आमदार अथवा खासदार होणार नाही, असे स्पष्ट मत रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केली.

पंढरपूर येथून आमदार महादेव जानकर Mahadev Jankar यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या 'जन स्वराज रॅलीचा' समारोप फलटण Phaltan येथे झाला. यावेळी जानकर बोलत होते. यावेळी रासपचे राज्य अध्यक्ष काशिनाथ शेवते, सचिव ज्ञानेश्वर मंदिर, जिल्हा अध्यक्ष खंडेराव सरक, बबन वीरकर,भाऊसो वाघ, वैशाली वीरकर,आदींची उपस्थिती होती.

रासपने भाजपशी युती केली आहे, भाजपमध्ये तो समाविष्ट झाला नाही. हा महादेव जानकर एकवेळ आत्महत्या करेल पण, अन्य कुठल्याही पक्षातून आमदार अथवा खासदार होणार नाही असे स्पष्ट करुन जानकर पंतप्रधान मोदींवर टीका करताना म्हणाले, निवडणूका आल्या की ओबिसीच्या नावाने मते मिळविता व ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेला विरोध करतात.

त्यामुळे तुम्ही खरच ओबीसी आहात का, असा सवाल ओबीसींनी पंतप्रधानांना विचारला पाहिजे. जर जातनिहाय जनगणना झाली तर काँग्रेस व भाजप उघडे पडेल व आपणास कसे फसविले हे जनतेच्या लक्षात येईल. मला मंत्रीपद देवून कुणी माझ्यावर उपकार केले नाहीत. आम्ही पाठींबा दिल्याने तुमचा मुख्यमंत्री झाला, खासदार झाले हे विसरु नका.

जर आमच्या ताटात माती टाकत असाल तर मी तुमचही ताट भरु देणार नाही, सुरुवात तुम्ही केलीत शेवट महादेव जानकर करेल, असा इशारा भाजपला दिला. मी माढ्यातुन लढावे अशी मागणी आहे. परंतू माझे लक्ष राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांवर आहे तेव्हा जनतेने रासपच्या पाठीशी ठाम रहात मतदान करावे, असे आवाहनही जानकर यांनी यावेळी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT