Satara News : अजित पवार चालणारे नाणे; मंत्रिमंडळ विस्तारात मिळेल ते मिळेल... शंभूराज देसाई

Eknath Shinde श्री देसाई म्हणाले, ‘आम्‍ही मोठ्या विश्‍‍वासाने मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे. अलीकडेच अजित पवार यांनी आमच्‍या सरकारबरोबर वाटचाल सुरू केली आहे.
Ajit Pawar, Shambhuraj Desai
Ajit Pawar, Shambhuraj Desaisarkarnama
Published on
Updated on

Shambhuraj Desai News : महाविकास आघाडीत उपमुख्‍यमंत्री म्‍हणून कार्यरत असताना अजित पवार यांचे विचार आणि धोरणे वेगळी होती. त्‍यांची आत्ताचे विचार आणि धोरणे वेगळी असून, ते आमच्‍या सरकारचा भाग आहेत. ते चालणारे नाणे असून, आमच्‍यात कोणत्‍याही प्रकाराची नाराजी नसल्‍याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारमध्ये पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात आमच्या वाट्याला जे काही मिळेल ते मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सातारा जिल्‍हा नियोजन समितीच्‍या माध्‍यमातून आगामी काळात होणाऱ्या विविध विकासकामांचा आढावा घेण्‍यासाठी आयोजित बैठकीनंतर शंभूराज देसाई Shambhuraj Desai जिल्ह्याधिकारी कार्यालयातील Satara collector पत्रकार परिषदेत बोलत होते. श्री देसाई म्हणाले, ‘आम्‍ही मोठ्या विश्‍‍वासाने मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांना साथ दिली आहे.

अलीकडेच अजित पवार यांनी आमच्‍या सरकारबरोबर वाटचाल सुरू केली आहे. ते आल्‍यामुळे आमच्‍यात कोणीही नाराजी नसून आमच्‍या गटातील मी नव्‍हे तर प्रत्‍येकजण मंत्री आहेत.’ आमदार भरत गोगावले, आमदार बच्‍चू कडू यांनी केलेल्‍या वक्‍तव्‍याबाबत विचारले असता श्री. देसाई म्‍हणाले, ‘आम्‍ही सर्वांनी मोठ्या मनाने अजित पवार आणि त्‍यांच्‍या सहकाऱ्यांचे स्‍वागत केले आहे. काही गोष्‍टी बदलतील. जो काही सत्तेचा वाटा मिळणार होता, तो तर आत्ताही मिळणारच आहे.’

Ajit Pawar, Shambhuraj Desai
जेव्हा Devendra Fadnavis घेतात नेत्यांचीच फिरकी | NCP | BJP | Jayant Patil | Girish Mahajan

आगामी काळातील खात्‍यांमध्‍ये बदल होण्‍याची शक्‍यता आहे का? या प्रश्‍नावर ते म्‍हणाले, ‘मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वाधिकार दिले आहेत. ते घेतील तो निर्णय मला व इतरांना मान्‍य असेल. अजित पवार यांच्‍या समावेशामुळे राज्‍यातील महाविकास आघाडीची वज्रमूठ ढिली झाली आहे. यापूर्वी मी वेगळ्या पक्षात आणि ते वेगळ्या पक्षात होते. त्‍यांची काम करण्‍याची पद्धत मी जवळून पाहिली आहे. मैत्री जपण्‍यात अव्‍वल असून, ते चलनी नाणे आहे.’

विकासकामांच्‍या अनुषंगाने नुकताच आढावा घेतला. यानुसार जिल्‍हा नियोजन समितीचा उपलब्‍ध असणारा सर्व निधी लवकरात लवकर खर्ची व्‍हावा, अशा सूचना मी केल्‍या आहेत. त्यानुसार करावयाच्‍या कामांचे कार्यादेश जुलै महिन्‍याच्‍या अखेरीपर्यंत निघतील, असे सांगत कामांचा दर्जा राखण्‍यासाठी तसेच गुणवत्ता तपासणीसाठी जिल्‍हा स्‍तरावर गुणनियंत्रण कक्ष स्थापणार असल्‍याचेही त्यांनी सांगितले.

Ajit Pawar, Shambhuraj Desai
Mumbai Agra Highway Accident : बुलडाण्यानंतर धुळ्यात भीषण अपघात; 12 जणांचा चिरडून मृत्यू

दरडग्रस्‍त गावांचे पुनर्वसन करण्‍यासाठी आराखडा तयार केला आहे. यासाठी आवश्‍‍यक असणारी जमीन आम्‍ही बाजारभावाच्‍या चौपट दराने खरेदीचा प्रस्‍ताव शेतकऱ्यांना दिला आहे. त्‍याला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्‍याने आमागी काळात आपत्कालीन गरज म्‍हणून एक मुदत देणार आहोत. या मुदतीत जमिनीची प्रक्रिया पूर्ण न झाल्‍यास शासननियमानुसार अधिग्रहणाची प्रक्रिया राबविण्‍यात येईल, असेही श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com