बेळगाव : कर्नाटकच्या (Karanatka) मुख्य सचिवांनी बेळगावला येऊ नये, असे पत्राद्वारे कळविले असले तरी मी बेळगावला जाणारच आहे, असे भूमिका सीमाप्रश्न समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी घेतली आहे. बेळगावचा नियोजित दौरा सीमाभागातील मराठी बांधवांच्या भावना जाणून घेण्यासाठी आहे, यामागे चिथावणीखोर भाषण करणे किंवा भावना भडकावण्यासाठी नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. (I will go to Belgaum: Chandrakant Patil)
सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावना आणि त्यांचे स्पष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. कर्नाटकाच्या मुख्य सचिवांनी सीमा प्रश्न समन्वय मंत्री आणि समितीच्या नेत्यांना बेळगाव दौऱ्यावर येऊ नये. सध्या परिस्थिती तणावपूर्ण या अशा स्वरूपाचे पत्र पाठवले आहे.
कर्नाटक सरकारच्या पत्रासंदर्भात पाटील यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी वरील उत्तर दिले. पाटील म्हणाले की, बेळगाव दौऱ्याला कर्नाटक सरकारकडून आडकाठी आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र, आम्ही तिथे जाऊन कोणत्या स्वरूपाचे चिथावणीखोर विधान किंवा भाषण करणार नाही. आम्ही तेथील मराठी बांधवांच्या भावना ऐकून घेणार आहोत. त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
आम्ही बेळगावला चिथावणीसाठी नाही तर लोकांचं म्हणणं ऐकण्यासाठी जाणार आहोत. कर्नाटकाच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून बेळगावला न येण्याबाबत कळविल्याच्या वृत्तालाही दुजोरा दिला आहे. मुळात मी ३ डिसेंबरला बेळगावला जाणार होतो. मात्र, सहा डिसेंबरला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप कार्यक्रम होत असतात. त्या सर्वांनी मला ६ डिसेंबरला येण्याबाबत कळविले आहे. त्यामुळे ३ आणि त्यानंतर ६ डिसेंबरला मला जाणे शक्य होणार नाही. त्यासाठी सहा डिसेंबर रोजी मी बेळगावला जाणार आहे.
सहा डिसेंबर रोजी कार्यक्रम खूप आहेत. त्यामध्ये सीमाभागाला भेट देणे, हुतात्म्यांच्या घरी भेट देण्यात येणार आहे. तसेच. डॉ. बी. आर. आंबेडकर या संघटनेचा एक कार्यक्रम स्वीकारला आहे. या दरम्यान बेळगावसह सीमाभागातील ८६५ गावांत काय करता येईल, कोणत्या सुविधा देता येतील, त्याची चर्चा करण्यासाठी दौरा आयोजित केल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.