चाकण (जि. पुणे) : खेडचे (Khed) माजी आमदार (स्व.) नारायणराव पवार यांची कन्या प्रिया पवार (Priya Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला होता. भाजपने त्यांच्यावर आता भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. खेडच्या प्रिया पवार यांना भाजपने थेट राज्य पातळीवर कामाची संधी दिली आहे. (Election of Priya Pawar as Regional Vice President of BJP Yuva Morcha)
नारायणराव पवार हे काँग्रेसच्या तिकिटावर खेड तालुक्यातून निवडून आले होते. त्यांच्या पाठीशी तालुक्यात जनता भक्कमपणे उभी होती. मात्र, त्यांची कन्या प्रिया पवार यांनी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यावर आता भाजपने थेट राज्य पातळीवरील पद सोपविले आहे.
भाजप युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे पत्र प्रिया नारायणराव पवार यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते देण्यात आले. त्यांची निवड केली असल्याचे पत्र भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी दिले आहे.
या नियुक्तीनंतर प्रिया पवार यांनी सांगितले की, माझे वडील खेड तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय नारायणराव पवार यांच्या विचारांवर तसेच मार्गदर्शनावर मी यापूर्वी काम केलेले आहे. मला असलेल्या सामाजिक व संघटनात्मक अनुभवाचा उपयोग पक्ष कार्यासाठी तसेच पक्ष वाढीसाठी निश्चितपणे करणार आहे.
भारतीय जनता पक्षाने मला जी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे पक्षाचे धोरण, विचारधारा पोचविण्यासाठी मी काम करणार आहे. राज्यातील तरुण-तरुणी यांच्यापर्यंत पक्षाची विचारधारा, धोरण पोचविण्याचे काम करून राज्यात पक्ष बळकट करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. राज्यात युवा मोर्चाच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढीसाठी पक्ष नेत्यांच्या सहकार्याने, मार्गदर्शनाने काम करणार आहे, असेही प्रिया पवार यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.