सोलापूर : आमचे खासदार (MP) (जयसिद्धेश्वर स्वामी (Jay siddheshwar Maharaj) यांच्याकडे बोट करत) येथे आहेत, त्यामुळे मी काही लोकसभेची (Loksabha) तयारी करत नाही. मी सध्या राज्यसभेवर (Rajya Sabha) आहे, माझा राज्यसभेचा कार्यकाळ अजून शिल्लक आहे. त्यामुळे आमच्या महाराजांना (जयसिद्धेश्वर स्वामी) डिस्टर्ब करण्यासाठी मी काही सोलापूरला येणार नाही, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी स्पष्ट केले. (I will not come to Solapur to disturb Jayasiddheshwar Maharaj: Ramdas Athavale)
केंद्र सरकारच्या गरीब कल्याण संमेलन कार्यक्रमासाठी रामदास आठवले आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांना सोलापुरात तुमचा हा दुसरा दौरा आहे, लोकसभेची तयारी सुरू केली आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर आठवले यांनी वरील उत्तर दिले.|
ते म्हणाले की, आजचा दौरा मला पीएमओकडून आलेला आहे, त्यामुळ आज मी या ठिकाणी आलो आहे. डॉ. पांडव आमचे मित्र आहेत, अलीकडेच त्यांची विमानप्रवासात भेट झाली, त्यावेळी त्यांनी सांगितले की मी मोहोळचा राहणारा आहे. त्यांनी मोहोळ येण्याचा आग्रह केला होता, त्यामुळे मी त्या कार्यक्रमाला आलो होतो. त्यामध्ये कुठलाही राजकीय हेतू नाही.
सोलापूरचे आणि आमचे संबंध कायम चांगले राहिलेले आहेत. पॅंथरच्या चळवळीपासून मी शेकडो वेळा सोलापुरात येऊन गेलो आहे. सोलापूर शहरातील गल्लीनगल्ली आणि जिल्ह्यातील गावागावांशी माझाला संबंध राहिलेला आहे. सोलापूर हे आंबेडकरी चळवळीचे मोठे केंद्र राहिलेले आहे. त्यामुळे या शहरात माझे कायम येणं-जाणं राहिलेले आहे. त्यामुळे माझ्या सोलापूर दौऱ्याचा राजकीय संबंध लावू नये, असे माझे मत आहे, असेही रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.