कृषी कायदे परत आणण्याबाबत सरकार नक्की विचार करेल : केंद्रीय मंत्र्यांचे सूचक विधान

मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कवितामय शुभेच्छा दिल्या.
Ramdas Athavale
Ramdas AthavaleSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : ‘मोदी साहेब (Narendra Modi) आणि माझी पडली होती गाठ, त्याला वर्ष झाली आता पूर्ण आठ आणि शेतकऱ्यांची आम्ही अजिबात सोडणार नाही पाठ. शेतकऱ्यांच्या दुष्मनांची लावून टाकू आम्ही वाट’ अशा शब्दांत मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी कवितामय शुभेच्छा दिल्या. तसेच, शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या सूचनांचा विचार करत नवीन कृषी कायदे (agricultural Act) परत आणण्यासंदर्भात केंद्र सरकार नक्की विचार करेल, असे विधानही आठवले यांनी या वेळी केले. (Central government will definitely consider bringing back agricultural Act : Ramdas Athavale)

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या खेड येथील कृषी विज्ञान केंद्रात गरीब कल्याण संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमास आठवले उपस्थित होते. त्या कार्यक्रमापूर्वी पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी वरील शब्दांत मोदी सरकारला शुभेच्छा दिल्या.

Ramdas Athavale
मोदींचे भाषण सुरू असतानाच केंद्रीय मंत्री आठवलेंना लागली डुलकी!

आठवले म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांनी दोन वेळा आमच्या पाठीशी राहून आम्हाला निवडून दिले आहे. त्यामुळे आम्ही केंद्र सरकार त्यांच्या विरोधात असूच शकत नाही. केंद्र सरकारने शेतकरी कायदे आणले, त्यामागे शेतकऱ्यांचे नुकसान व्हावे, अशी आमची भावना अजिबात नव्हती. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातही शेतकरी कायदे आणू, असे सांगितले होते. मात्र, आम्ही आणलेल्या कायद्याला काँग्रेसकडून विरोध करण्यात आला.

Ramdas Athavale
‘दामाजी’चे बिगूल वाजले : समाधान आवताडेंना महाविकास आघाडी देणार टक्कर!

शेतकरी कायदे परत आणायचे असतील, तर सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करावे लागतील. मागचे शेतकरी कायदे गेले. तेच कायदे परत आणायचे प्रयत्न झाले, तर शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होईल. शेतकऱ्यांसोबत झालेल्या सूचनांचा विचार करुन नवीन कायदे आणण्यासंदर्भात केंद्र सरकार नक्कीच विचार करेल. आम्ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करत आहोत, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करुनच नवीन कायद्यासंदर्भात विचार करण्यात येईल. पुढील अधिवेशनात हे कृषी कायदे आणणार नाही. कारण, आमच्याकडे अजून दोन वर्षे बाकी आहेत आणि आणखी पाच वर्षे आमचेच सरकार असणार आहे, त्यामुळे सर्वांचा सल्ला घेऊनच निर्णय घेऊ, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com