Ravikant Tupkar - Raju Shetti  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ravikant Tupkar Press Conference: मी 'स्वाभिमानी'तच राहणार: नाराजीच्या चर्चांवर तुपकर थेट बोलले

Swabhimani Shetkari Saghtana Politics: रविकांत तुपकर राजू शेट्टींवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Buldhana Ravikant Tupkar News: माझी नाराजी व्यक्तिगत नाही हा संघटनेचा प्रश्न आहे, सर्व गोष्टी मी शेट्टींच्या कानावर टाकल्या आहेत. मी दुसरा गट स्थापन करणार नाही. मी संघटनेत राहुनच काम करणार,अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केलं आहे.

राजू शेट्टी शनिवारी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी आले असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी तुपकरांविषयी भूमिका मांडली. "रविकांत तुपकर यांनी माध्यमांसमोर न बोलता आठ ऑगस्टला शिस्त पालन समितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत त्यांनी बोलावं असं राजू शेट्टींनी सांगितलं होतं. पण तुपकर यांनी आपण समितीच्या बैठकीलाही जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मी या समितीच्या बैठकीला येणार नाही. मी यासंदर्भातील गोष्टी अवगत केल्या आहेत. आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. मी या पक्षात जाणार त्या पक्षात जाणार या अफवा आहेत, त्या सर्वात आधी थांबवा, अशी विनंतीही तुपकरांनी केली आहे. मला संघटनेत राहुनच शेतकरी चळवळीचं काम करायचं आहे. शेतकरी हा माझा आत्मा आहे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मला शेतकऱ्यांसाठी लढत राहायचं आहे. हा निर्णय मी घेतला असून आजपासून कामालाही सुरूवात केली आहे. असही तुपकरांनी ठणकावून सांगितलं आहे.

माझी जी काही नाराजी आहे, आक्षेप आहे, महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचं जे दुखण आहे तते मी राजू शेट्टींच्या कानावर घातले आहेत. मीझी नाराजी व्यक्तिगत हितासाठी नाही, चळवळीच्या हितासाठी आहे. महाराष्ट्रात चळवळ कशी वाढेल याबाबत मी त्यांना सर्व गोष्टी आधीच सांगितल्या आहेत. पण मी एकच गोष्ट रोजरोज कशी सांगायची, हाही प्रश्न आहे. आम्ही जे आक्षेप नोंदवले आहेत ते पाच वर्षांपासून सुरू आहे. यात जी काही अंमलबजावणी करायची असेल, सकारात्मक निर्णय घ्यायचे असतील ती त्यांनी करायची आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढण्यात अनेकांनी लाठ्याकाठ्या अंगावर झेलल्या आहेत. मला महाराष्ट्रात शेतकरी तरुणांची एवढी मोठी फौज तयार करायची आहे की, या तरुणांच्या एका हाकेला सरकारही घाबरेल, अशी फौज मला तयार करायची आहे. त्यामुळे तुपकर एकडे जाणार तिकडे जाणार, अशा अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहे. पण मी संघटनेच राहणार असल्याचं तुपकरांनी पुन्हा एकदा निर्धाराने सांगितलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT