Solapur BRS Politics: सोलापूरमधील आजी-माजी सरपंचांसह ५२ जण बीआरएसच्या गळाला; स्थानिक नेत्यांची डोकेदुखी वाढली!

BRS in Solapur News : दक्षिण सोलापूरमधील तब्बल ६० वाहनांचा ताफा हैदराबादमध्ये दाखल झाला होता.
KCR : BRS
KCR : BRSSarkarnama
Published on
Updated on

Hyderabad News : दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक आजी - माजी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी काल सोमवारी (दि.७ ऑगस्ट) रोजी भारत राष्ट्र समितीमध्ये (BRS) प्रवेश केला आहे. यामध्ये एकूण ५२ ग्रामीण पुढाऱ्यांचा समावेश असलेच्या दावा पक्षाचे नेते सचिन सोनटक्के (Sachin Sontakke) यांनी केला आहे. (Latest Marathi News)

KCR : BRS
Vijay Wadettiwar News : राणेंसोबत शिवसेना सोडून गेलेल्या वडेट्टीवार यांना दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेते पदाची संधी..

हैदराबाद येथे बीआरएसचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या कार्यक्रमासाठी दक्षिण सोलापूरमधील तब्बल ६० वाहनांचा ताफा हैदराबादमध्ये दाखल झाला होता. बीआरएसच्या वाढत्या प्रभावामुळे भाजप आमदार सुभाष देशमुख आणि माजी आमदार दिलीप माने यांची डोकेदुखी मात्र वाढण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सोलापूरमध्ये सुरू आहे.

KCR : BRS
Mantralaya Threat Call: एक-दोन दिवसात अतिरेकी हल्ला करणार; थेट मंत्रालयाला धमकी!

निवडणुका तोंडावर असताना बीआरएसच्या या भागात वाढलेल्या प्रभावामुळे स्थानिक राजकीय गणित बदलण्याची चिन्हे आहेत. सोलापूर महानगरपालिकेचे काही माजी नगरसेवकांनीही यापूर्वीच बीआरएस प्रवेश केला होता. यानंतर आताच्या या पक्षप्रवेशामुळे बीआरएसचे प्रस्थ वाढले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com