Phaltan, 13 April : हे बाळ मला बोललं (आताचे आमदार). रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या काळात काय केले. अरे माझ्या काळात मी काय केले, हे विचारायला तुझा जन्म तरी झाला होता का? कशाला विचारतो? तुझ्या वडिलांना सगळं माहिती आहे, त्याचे वडील आमच्या घराण्याशी संबंधित आहेत. काय केले? कसे केले, त्याचं मला काही नाही. त्याच्यावर पहिल्यांदा आणि शेवटचंच बोलणार आहे. मी काही त्याच्याकडे लक्ष देणार नाही. माझी ती सवय नाही. चिलटं तर काय येतच असतात. चिलटं, डास येतच असतात. ढेकूण तर चावतच असतात, आपल्याला काय व्हायचंय? असा सवाल विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
परवा आमचे नवनिर्वाचित आमदार काहीतरी बोलून गेले. खंर मी त्या माणसाकडं लक्षच देत नाही. त्या माणसाबद्दल बोलून माझा स्वतःचा कमीपणा करून घेण्याची माझी अजिबात इच्छा नाही. कृष्णा खोरे महामंडळ त्याला काय त्याच्या नेत्यालाही माहिती नाही. तो एक पाळीव पोपट आहे. मालक जो बोलतो आणि मालक जो शिकवतो, तेवढं तो इथं येऊन बोलतो. त्यामुळे कशाला त्यांच्यावर बोलायचं, अस सवाल आमदार निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले, त्यांना या भागाचं एवढंच कल्याण करायची हौस आलेली असेल, तर ज्याचा उल्लेख माजी आमदार दीपक चव्हाण (Deepak Chavan) यांनी केला. त्या एनआयडीसीची एमआयडीसी म्हसवडमधून फलटणमध्ये आणू नको ना. आम्हीच तुमचं नेतृतव मानतो. सुळशी धरणाचे पाणी. सातारा जिल्ह्यात सर्व जण मातब्बर आहेत. मी कोणालाही दोष देत नाही. कुठल्याही मंत्र्याला आणि आमदाराला बोलत नाही. आम्हाला जो पाणी देईल, त्याला आम्ही मतं टाकू. हे आम्ही कार्यकर्त्याला म्हणत नाही, तर आमच्या मतदारांना माझे आवाहन आहे.
तुम्ही कोणालाही विचारा, तुमच्या भागातील फार थोड्या लोकांना पाणी प्रश्नाची कळकळ आणि ज्ञान आहे. मला माफ करा, इथं फार वरिष्ठ नेतेमंडळी बसलेली आहेत. पाणी आणायला काय नुसत्या फक्या माराव्या लागतात का? तसं असतं तर फार सोपं झालं असतं, असेही रामराजेंनी नमूद केले.
इथ बसलेल्या ज्येष्ठ मंडळींनी कितीवेळा फक्या मारल्या. मला काही माहिती नाही वाटतं का? नुसतीच फक्की मारायची. कालवा आला, कालवा आला. निवडणूक आली की फक्की मारली जाते. पण हे असं करून कामं होत नसतात, असाही टोला ह्यांनी सत्ताधाऱ्याना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.