Maharashtra Politics : शिवसेनेच्या मंत्र्यानेच एकनाथ शिंदेंना तोंडघशी पाडले; म्हणाले, ‘माझ्या खात्याला तरी पुरसा निधी मिळालेला आहे’

Sanjay Rathod Statement : अर्थ खात्याकडून शिवसेनेच्या मंत्र्यांना पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. त्यावर शिवसेनेचे जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले, त्या संदर्भातली माहिती मी आता देऊ शकत नाही. तो काय विषय आहे, याची माहिती घेऊन मी बोलतो.
Mahayuti Leader
Mahayuti Leader Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 13 April : अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून शिवसेनेच्या मंत्र्यांना निधी मिळत नसल्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केल्याची काल दिवसभर चर्चा होती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही दोन दिवसांपूर्वीच एसटी बसच्या चालक-वाहकांच्या पगारावरून अजितदादांवर नाराजी व्यक्त केली होती. त्यावर शिवसेनेचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी वेगळाच सूर लावला आहे.

अर्थ खात्याकडून शिवसेनेच्या मंत्र्यांना पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे, अशी चर्चा शनिवारी दिवसभर सुरू होती. त्यावर शिवसेनेचे जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले, त्या संदर्भातली माहिती मी आता देऊ शकत नाही. तो काय विषय आहे, याची माहिती घेऊन मी बोलतो.

शिवसेनेच्या मंत्र्यांकडील खात्याला निधी मिळत नाही, असे मला तरी कुठं दिसलं नाही. माझ्या जलसंधारण खात्याला प्रस्तावित करण्यात आलेला निधी मिळालेला आहे, प्रत्यक्ष अनुदानही मंजूर झाले आहे. जलसंधारण खात्याला यापूर्वीही पैसे मिळाले आहेत, आताही पैसे मिळत आहेत, असेही संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी स्पष्ट केले.

Mahayuti Leader
Shivsena UBT : पोस्टर फाडले उद्धव ठाकरेंचे; पण सोलापूर उपशहरप्रमुखावर गुन्हा दाखल झाला ‘या’ कारणांमुळे

जलसंधारण मंत्री राठोड म्हणाले, मी चारदा मंत्री झालो आहे आणि पाचव्यांदा निवडून आलो आहे. राज्यात सध्या वेगवेगळ्या योजना चालू असतात. जसं लाडकी बहीण योजना चालू आहे. विकासाचे प्रकल्प आहेत, त्यामुळे निधी वाटपात 19-20 होतं. मात्र, त्याचा अर्थ असा नाही की खात्याकडे दुर्लक्ष होतं किंवा खात्याला पैसेच मिळत नाहीत. माझ्या तरी खात्याला निधी मिळाला आहे. चांगलं काम करण्याचा प्रयत्न अधिकारी आणि प्रशासन करत आहेत.

Mahayuti Leader
Sushil Kumar Shinde : वसंतराव नाईकांनी मला 1974 मध्ये दहा हजार रुपये दिले होते; सुशीलकुमार शिंदेंनी सांगितली ‘ती’ आठवण!

रायगड दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधीबाबत अर्थमंत्री अजित पवार यांची तक्रार केली, अशी चर्चा शनिवारी दिवसभर सुरू होती. त्याबाबत खुद्द अजित पवार यांनाही प्रश्न विचारल होता. त्या वेळी त्यांनी मला याबाबत अमित शाह काय म्हणाले नाहीत, असे स्पष्ट केले. मी आणि एकनाथ शिंदे हे आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी एकत्र येतो, त्यामुळे ते मला याबाबत बोलले असते. पण ते अमित शाह यांच्याकडे तक्रार नाहीत, असे अजित पवार यांनी म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com