Kolhapur Water Distribution : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Water News: इचलकरंजीचा पाणी प्रश्न सुटणार; मुख्यमंत्र्यांनीच दिलं आश्वासन

Kolhapur News : उद्योगनगरी असलेल्या इचलकरंजी शहराला पाण्याचा तुटवडा जाणवत आहे.

सरकारनामा ब्यूरो

Ichalkaranji News : पाण्यासाठी इचलकरंजी आणि कागलवासियांमध्ये सुरू असलेल्या वादात आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच हस्तक्षेप केला आहे. या प्रकरणी आपण स्वत: बैठक घेऊन यावर तोडगा काढू, असं आश्वासन दिल्याने इचलकरंजीकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे आता इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न सुटेल, अशी आशा वाटू लागली आहे.

इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या सुळकूट योजना मंजूर करण्यात आली आहे. पण सुळकूटमधून पाणी देण्यास कागलवासियांचा तीव्र विरोध आहे. यावरून गेल्या आठवड्याभरापासून यावरून कागल आणि इचलकरंजी वासियांमध्ये पाण्याचा प्रश्न पेटला आहे. पण मुख्यमंत्री शिंदेंनीच याबाबत बैठक घेण्याचं आश्वासन दिल्याने इचलकरंजीकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता मार्ग निघेल, अशी आशा वाटू लागली आहे.

उद्योगनगरी असलेल्या इचलकरंजी शहराला पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. पंचगंगा नदी शहराच्या जवळून वाहते मात्र ते पाणी दूषित आहे. त्यामुळं रोगराई पसरते. त्यामुळे बाहेरून पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही. शासनाने दूधगंगा नदीतून पाणी आणण्यासाठी योजना मंजूर केली आहे. ती योजना सुळकूट येथून होणार आहे. मात्र कागल तालुक्यातील लोकांचा विरोध आहे.

या पार्श्वभूमीवर इचकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालण्याची विनंती केले. ती मान्य करून एकनाथ शिंदे यांनी याबाबत बैठक घेऊ, असं सांगितलं आहे. या बैठकीला कागल तालुक्यातील राजकीय नेतेही उपस्थित राहतील. त्यामुळे या योजनेबाबत असलेले गैरसमज काढण्याचा प्रयत्न होईल. त्यात मुख्यमंत्र्यांचा आदेश कागलमधील नेत्यांना डावलता येणं कठीण आहे. त्यामुळे इचकरंजीकराचा पाणी प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT