Fadanvis on Police : फडणवीसांचा पोलिसांना सल्ला, प्रलोभनांना बळी पडू नये!

Home Minister Devendra Fadanvis feels cyber crime is prime challange-गृहमंत्री फडणवीस यांनी पोलिस उपनिरीक्षकांना पैसा, प्रतिष्ठा नव्हे, तर सामाजिक संवेदना जिवंत ठेवा असे आवाहन केले.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Nashik Police News : काळाची गरज लक्षात घेउन आणि माहिती तंत्रज्ञान आत्मसात करून सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र (Maharashtra) पोलिस अकादमीच्या पोलिस (Police) उपनिरीक्षकांच्या १२२ व्या तुकडीचा दीक्षान्त समारंभ नाशिक येथे झाला.

Devendra Fadanvis
Dhule BJP : गिरीश महाजन बेफाम नगरसेवकांना लगाम घालण्यात अपय़शी?

यावेळी फडणवीस यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांना संदेश दिला. ते म्हणाले, आपल्या जीवनात अनेक प्रलोभने येतील. परंतु, त्या प्रलोभनांना बळी न पडता आज याठिकाणी आपण घेतलेल्या शपथेचे स्मरण त्या वेळी करावे. पद, प्रतिष्ठा, पैसा मिळेल; परंतु त्याबरोबरच आपली समाजाप्रती असलेली संवेदना कायम जिवंत ठेवा.

समाजातील दुखावलेला, अन्यायग्रस्त घटक तुमच्याकडे येईल, त्या वेळी तुमच्यात असणाऱ्या संवेदना जिवंत असायला हव्यात, त्यासाठी आपण पोलिस सेवेचे व्रत पत्करले आहे, याचीही जाणीव असावी.

Devendra Fadanvis
Congress Vs NCP : इस्लामपुरातील कार्यालय नक्की कोणाचे ? दोन्ही काँग्रेसमधील वाद चिघळणार...

फडणवीस म्हणाले, समाजातील चांगल्या प्रवृत्तींचे रक्षण करून वाईट प्रवृत्तींचा बीमोड करणे ही आपली आद्य जबाबदारी आहे. भारतीय संविधानाने आपल्या सर्वांना समान दर्जा दिला असून, कर्तव्य पार पाडताना कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता भारतीय संविधानाची घेतलेली शपथ निभावण्यासाठी कायम प्राधान्य द्यावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com