Shivaji Sawant Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivaji Sawant : शिवाजी सावंत भाजप प्रवेशासाठी वेटिंगवर; मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना दोनदा भेटूनही तारीख मिळेना, आता म्हणतात, ‘इतर पर्याय खुले...’

Solapur Political News : माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत भाजप प्रवेशासाठी अद्याप प्रतीक्षेत असून मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली आहे. प्रतिसाद न मिळाल्यास इतर पर्याय खुले ठेवले आहेत.

Vijaykumar Dudhale
  1. माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेचा राजीनामा दिला, पण अद्याप त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झालेला नाही.

  2. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांची दोनदा भेट घेतली, मात्र तारीख ठरलेली नसल्याने चर्चेला उधाण आले आहे.

  3. भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास इतर पक्षांचे पर्याय खुले असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

Solapur, 18 October : माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांंनी दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेचा राजीनामा दिला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांची दोनवेळा भेट घेऊनही सावंत यांना प्रवेशासाठी अद्याप तारीख मिळालेली नाही. यावर खुद्द शिवाजी सावंतांनीच भाष्य केले असून भाजपच्या संपर्कात आहे. मात्र, भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास आपल्याला इतर पक्षांचे पर्याय खुले आहेत, असे स्पष्ट केले आहे.

शिवसेनेकडून डावलले जात असल्याने शिवाजी सावंत (Shivaji Sawant) यांनी जिल्हा संपर्कप्रमुखपदाचा ३१ जुलै रोजी राजीनामा दिला होता. त्यानंतर सावंत यांनी सोलापूरचे पालककमंत्री जयकुमार गोरे यांची दोनवेळा भेट घेतली. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. मात्र, त्यांना अजूनपर्यंत भाजप प्रवेशाचा तारीख मिळू शकलेली नाही, त्यामुळे सावंतांचा भाजप प्रवेश नेमका कधी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

शिवाजी सावंतांसोबतच शिवसेना सोडणारे सोलापूरचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी दोन दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मात्र, शिवाजी सावंतांचा प्रवेश अजूनही होऊ शकलेला नाही, त्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी आज माध्यमांशी बोलताना भाजप (BJP) प्रवेशाबाबतची भूमिका स्पष्ट केली.

सोलापूर जिल्ह्यातील चार माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्रा. शिवाजी सावंत यांना रखडलेल्या भाजप प्रवेशाबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुखपदाचा राजीनामा दिल्यानंतर मी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची दोन वेळा भेट घेतली. त्यांनी याबाबत वरिष्ठांची चर्चा करून असे आश्वासन दिले.

गोरे यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत दोन वेळा भेटून चर्चा केली. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांना पक्षप्रवेशाबाबतच्या चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. आपण याबाबत सविस्तर चर्चा करू, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते, असेही सावंतांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर पालकमंत्री व मुख्यमंत्री यांच्याशी दोनदा चर्चा केली. सोलापूर जिल्ह्यातील इतर चार माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी मला भाजप प्रवेशाबाबत विचारले. जर भाजपने आपल्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, तर आपल्याला इतर पक्षांचे पर्याय खुले आहेत, असे सूचक विधान त्यांनी केले आहे.

Q1: शिवाजी सावंत यांनी कोणत्या पक्षाचा राजीनामा दिला?
A1: त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला आहे.

Q2: त्यांनी कोणत्या नेत्यांची भेट घेतली आहे?
A2: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली आहे.

Q3: त्यांचा भाजप प्रवेश का रखडला आहे?
A3: मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे प्रवेशाची तारीख निश्चित झालेली नाही.

Q4: भाजपने प्रतिसाद दिला नाही तर शिवाजी सावंत काय करतील?
A4: त्यांनी स्पष्ट केले आहे की, इतर पक्षांचे पर्याय त्यांच्यासाठी खुले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT