Ranjitsinh Naik Nimbalkar-Ranjitsinh Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nimbalkar On Mohite Patil : खासदार निंबाळकरांचे मोहिते पाटलांबाबत मोठे विधान : ‘आम्ही प्रामाणिकपणे...’

सर्वांनी एकत्र फिरावं, असं काही नाही. पक्षाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात.

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने (BJP) उद्या मोहिते पाटील (Mohite Patil) यांना तिकिट दिले, आम्ही प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी उभे राहून प्रचार करू, असे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांनी स्पष्ट केले. (If BJP gives ticket to Mohite Patil from Madha then we will campaign for him : Ranjitsinh Naik Nimbalkar)

माढ्याचे खासदार निंबाळकर हे आज (ता. ४ एप्रिल) माढा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी माढ्यात पत्रकारांशी बोलताना त्यांना लोकसभा उमेदवारीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावेळी नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटलांना तिकिट मिळाले तर त्यांचा प्रामाणिकपणे प्रचार करू असे सांगितले.

रणजितसिंह निंबाळकर म्हणाले की, रणजितसिंह मोहिते पाटील हे आमदार आहेत. सर्वांनी एकत्र फिरावं, असं काही नाही. पक्षाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. त्यांना सांगोल्याची जबाबदारी दिली होती, त्यांनी त्या ठिकाणी काम करावं. मी काल दिल्लीत होतो, आज कार्यक्रमानिमित्त माढ्यात यावं लागलं. सगळ्यांनी एकत्र फिरावं, असं काही नाही.

भारतीय जनता पक्षात लोकशाही आहे. भाजपला वाटलं, उद्या माढ्यातून अन्य व्यक्तीला तिकिट द्यावं. नाव घेऊन सांगायचं झालं तर मोहिते पाटील यांना तिकिट द्यावं, असं पक्षाला वाटलं. त्यांना जरी तिकिट दिलं तर आम्ही प्रामाणिकपणे मोहिते पाटील यांच्या पाठीमागं उभे राहणार आहोत. त्यामुळे पक्षात वाद होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. माझी शंभर टक्के कामे झाली आहेत, त्यामुळे पाच वर्षांच्या कामावर मी पूर्णपणे समाधानी आहे. त्यामुळे भाजपचा कार्यकर्ता असून पक्ष जे सांगेल ते काम मी करणार आहे, असेही निंबाळकर यांनी नमूद केले.

ते म्हणाले की, खासदार निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात मतभेद असून त्यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे, अशी चर्चा मतदारसंघात कायम चर्चिली जाते. तसेच, यावेळी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मोहिते पाटील इच्छूक असल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे. त्याचबरेाबर मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यात मतभेद असून ते कुठल्याही कार्यक्रमाला एकत्र नसतात.

मध्यंतरी दिल्लीत माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि माजी आमदार राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीमागे निंबाळकर असल्याची चर्चा होती. मोहिते पाटील यांना शह देण्यासाठी निंबाळकर हे शिंदे यांच्याशी जवळीक साधत आहेत, त्यांना भाजप प्रवेशाचे निमंत्रण देत आहेत, अशी चर्चाही राजकीय वर्तुळातून होत असते, त्यामुळे निंबाळकर यांच्या आजच्या विधानाला महत्व आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT