MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosale sarkanama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : माझं वय सांगायचा कुणी प्रयत्न केला, तर याद राखा : उदयनराजेंचा इशारा कोणाला

Umesh Bambare-Patil

Udayanraje Bhosale News : माझं वय मी सांगणार नाही आणि कुणी सांगायचा प्रयत्न केला तर याद राखा. मी कोणाला सोडणार नाही, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी दिला आहे.

खासदार उदयनराजे भाेसले यांचा शुक्रवारी वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात दोन दिवस आधीपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा शहरात विविध ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर झळकले आहेत. बुधवारी रात्री साताऱ्यातील गांधी मैदानावर शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले होते. या

स्पर्धेला खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी कॉलर उडवून उपस्थित तरुणांची मने जिंकली.यावेळी अभिनेता अनुप सिंह ठाकूर उपस्थित होता.उदयनराजेंनी यावेळी नेहमी प्रमाणे आपली कॉलर उडवली. त्यामुळे उपस्थित तरुणांनी एकच जल्लोष केला.

यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले, माझं वय मी सांगणार नाही आणि कुणी सांगायचा प्रयत्न केला तर याद राखा. मी कोणाला सोडणार नाही,असा इशारा त्यांनी दिला. शरीर सौष्ठव स्पर्धेविषयी ते म्हणाले, मी जर या ठिकाणी स्पर्धेत पोज मारायला लागलो, तर इथे कोणीही थांबणार नाही, अशी टिपण्णी त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT