Raju Shetty Warning :  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti Warning : हिंमत असेल तर राज्याबाहेर जाणारा ऊस आडवून दाखवा; राजू शेट्टींचे सरकारला चॅलेंज

अनुराधा धावडे

Kolhapur Political News : 'राज्याबाहेर ऊस नेण्यास बंदी घालणे हा अत्यंत मूर्खपणाचा निर्णय आहे. कायद्याचा बडगा दाखवून ऊस मिळवण्याचा प्रयत्न केला, तर कायदा धुडकावून लावू, राज्य सरकारमध्ये हिंमत असेल, तर राज्याबाहेर जाणारा ऊस आडवून दाखवा,' असे आव्हान राजू शेट्टी यांनी सरकारला दिले. राज्य सरकारने नुकताच राज्याबाहेर ऊस घालण्यास बंदी घातली आहे. त्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मोदी सरकार वन नेशन वन मार्केट मानत आहे, त्याला शेतीमालसुद्धा अपवाद नाही. केंद्र सरकारच्या धोरणात विरोधात जाऊन विपरित निर्णय घेतला जात आहे. जो कारखाना जास्त दर देतो त्या ठिकाणी ऊस घालण्यास परवानगी असली पाहिजे. पण कायद्याचा बडगा दाखवून ऊस मिळवण्याचा प्रयत्न केला. कायदा धुडकावून लावू, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

गेल्या तीन वर्षांपासून साखर कारखान्यांकडून बिल घेतली नसल्याने अंतिम बिल मिळालेलं नाही, सरकार आपली जबाबदारी पाडत नाही. कान धरून हिशेबाने पैसे देण्यास भाग पाडत नाही, राज्यात ऊस कमी पडतो म्हणून बाहेर ऊस घालण्यास बंदी घातली जात असल्यास ही दुटप्पी भूमिका असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. राज्य सरकारने साखर कारखानदारांच्या किती जरी दाढ्या कुरवाळल्या तर आम्हाला जो साखर कारखानदार जास्त दर देईल त्यालाच आम्ही ऊस घालू, असा पवित्रा ही शेट्टी यांनी घेतला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT