Akola News : भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते व राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीसांना नेते म्हणून घडवण्यात आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंत पोहाेचवण्यात माझाचा मोठा हातभार होता. यामुळेच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत येऊ शकले. मात्र, वेळ बदलताच त्यांनी कुरघोडी केली. राजकारण हे राजकारणाच्या जागी, पण फडणवीसांची अशी सूडवृत्ती आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला अशोभनीय आहे,' अशा शब्दांत खडसे यांनी फडणवीसांना सुनावले. (Latest Marathi News)
अकोल्यात एका कार्यक्रमानिमित्त खडसे आले होते. या वेळी खडसे म्हणाले, "फडणवीसांना मी अनेक गोष्टी शिकवल्या. मी २०१४ मध्ये विरोधी पक्षनेता होतो. मी जिथे बसायचे तेथील मागची जागा त्यांनी बसायला दिली. माझी संधी असतानाही माझ्याऐवजी मी त्यांना सभागृहात बोलायला अनेकदा वेळ दिला. महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांवर ते बोलते झाले. त्यांच्यातही कौशल्य होतेच. मात्र, नंतर त्यांची राजकीय कुरघोड्या करण्याची वृत्ती बळावली. ज्या व्यक्तीने आपल्याला घडवले आहे, त्याच व्यक्तीच्या विरोधात अशा कारवाया करणे, छळ करणे योग्य नाही, अशी मनातली खदखद खडसेंनी व्यक्त केली.
भाजपमधील विनोद तावडे, पंकजा मुंडे अशा नेत्यांचेही मनोबल खच्चीकरण करण्यात आले. मात्र, यातून ते सावरत आहेत. राज्यात नाही, पण राष्ट्रीय पातळीवर, देशाच्या राजकारणात ते रुळत आहेत. त्यांना आपले राजकीय निर्णय घेता येत नाहीत, अशी त्यांची स्थिती आहे. पंकजा मुंडे या एक प्रगल्भ नेत्या आहेत. त्या लवकरच निर्णय घेऊ शकतात. मी मात्र निर्णय घेऊन विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे, असेही खडसे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.