MLA Jaykumar Gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maan : जिहे-कटापूर योजना सौर ऊर्जेवर चालविणार... जयकुमार गोरे

साताऱ्यातील शासकिय विश्रामगृहात आमदार गोरे Jaykumar Gore यांच्या उपस्थितीत विविध सिंचन योजनांचा various irrigation schemes आढावा घेण्यात आला.

विशाल गुंजवटे

बिजवडी : गुरुवर्य कै. लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेसाठी लागणारी वीज सौर ऊर्जेव्दारे तयार करण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचा सर्व्हे तसेच तारळी योजनेच्या कोपर्डे पोहोच कालव्याचे काम त्वरित पूर्ण करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

साताऱ्यातील शासकिय विश्रामगृहात आमदार गोरे यांच्या उपस्थितीत विविध सिंचन योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला टेंभू योजनेचे अधीक्षक अभियंता रेडियार, जिहे कटापूर प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता अमोल निकम, उरमोडी प्रकल्प अधिक्षक अभियंता अमर काशीद उपस्थित होते. बैठकीत आमदार गोरेंनी जिहे कटापूर, टेंभू आणि तारळी योजनांच्या सद्यस्थितीतील कामांचा आढावा घेतला.

टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या सर्व्हेचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गुरूवर्य कै. लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेला लागणारी वीज सौर ऊर्जेद्वारे तयार करण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करा, अशी सूचना त्यांनी केली.

ही उपसा सिंचन योजना खरीप हंगामानंतर रब्बी हंगामात सुरु राहण्‍यासाठी खरीपातील वाचलेले पाणी वापरण्यास मान्यता मिळणेबाबत फेर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तारळी प्रकल्पांतर्गत कोपर्डे पोहोच कालव्याचे काम त्वरित पूर्ण करुन तारळी धरणाचे पाणी प्रकल्पीय नियोजनाप्रमाणे वापरण्यास सुरुवात अधिकाऱ्यांना आमदार गोरेंनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT