Satara DCC Bank President Nitin Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : गावबंदीचा फटका : जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षांना ओझर्डे गावाबाहेरच रोखले

Umesh Bambare-Patil

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत गावात राजकीय नेत्यांना प्रवेश नाही, असा ठराव झाल्याचे सांगून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना ओझर्डे गावातून परत पाठवण्यात आले. दरम्यान, यावेळी झालेल्या वादावादीत नितीन पाटील यांनी धमकी दिल्याची तक्रार मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते कल्याण पिसाळ यांनी केली आहे.

ओझर्डे गावात किसन वीर कारखान्याला ऊस घालावा असे आवाहन करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील Nitin Patil येणार होते. मात्र जोपर्यंत मराठा आरक्षण Maratha Reservation मिळत नाही तोपर्यंत गावात कोणत्याही राजकीय नेत्याला येवू द्यायचे नाही, असा एकमताने ठराव झाल्याचे सांगून कल्याण पिसाळ, केशव पिसाळ व इतर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते जमले.

रात्री आठ वाजता नितीन पाटील ओझर्डे गावात आल्यानंतर आंदोलनकर्ते कल्याण पिसाळ यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. आमचा कारखान्याचे पदाधिकारी व कर्मचारी यांच्याविषयी कुठलाही रोष नाही, गावात राजकीय पुढार्यांच्या जाहीर कार्यक्रमास बंदी घातली आहे, तसा गावाने ठराव केला आहे. आपण सन्मानाने परत जावे अशी सूचना केली. .

त्यावर नितीन पाटील यांनी आपल्याला दमदाटी करत तुला कोणत्याही गावात फिरु देणार नाही, कसा फिरतोस तेच बघतो अशा भाषेत धमकावले असल्याचा आरोप कल्याण पिसाळ यांनी करीत त्याबाबतचा व्हिडीओ सादर केला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. Maharashtra Political News

त्यांचा मराठा आरक्षणाशी संबंध नाही...

ओझर्डे येथे किसन वीर कारखान्याला ऊस घालावा यासंदर्भात शेतकरी सभासदांना आवाहन करण्यासाठी आम्ही तेथे गेलो होतो. त्यावेळी कल्याण पिसाळ आणि केशव पिसाळ हे दोघे तेथे होते. पिसाळ यांचे ऊस तोडणी मिशन असून ते ओझर्डे गटात शरयु कारखान्याला चालते. कल्याण पिसाळ हेही दुस-या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांना किसनवीर कारखान्याचा ऊस तोडणी प्रोग्राम राबवू द्यायचा नाही, म्हणून मराठा आरक्षणाला पुढे करून हे राजकीय कारस्थान करीत आहेत, त्याला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही, असे नितीन पाटील यांनी सांगितले.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT