Pimpri Chinchwad : राज्यातील भाजपप्रणित शिंदे सरकार हे गंमत- जंमतचे सरकार आहे. त्यात एक मंत्री सहा जिल्ह्याचा पालकमंत्री असून वर्षभरानंतरही १७ जिल्ह्याला अजून पालकमंत्री नाहीत.त्यामुळे १५ ऑगस्टला ध्वजारोहण कोण करणार यावरून सरकारमध्ये सावळागोंधळ आहे, असा हल्लाबोल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी (ता.११) केला.
पालकमंत्रीपदावरून राज्यातील महायुती सरकारमध्ये सुरु असलेल्या सुप्त संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोलें(Nana Patole)नीवरील टोलेबाजी मुंबईत टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना केली. मुख्यमंत्र्यांच्या एका खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्री डोळा ठेवून आहे,अशी कोपरखळी त्यांनी यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांचे नाव न घेता त्यांना मारली.
तीन पक्षांच्या या सरकारला जनतेच्या समस्यांचे काहीही पडलेले नाही. राज्यातील प्रशासन कोलमडले आहे. प्रशासनावर सरकारचा वचक नसल्याने भ्रष्टाचार बोकाळला आहे. राज्यात दुबार पेरणीचे संकट आहे, खरीपाची पिके धोक्यात आहेत. अशारितीने जनता बेहाल असताना त्यांच्यासाठी काही करण्याऐवजी सरकारी तिजोरी कोण जास्त लुटतो याची तीन पक्षांत स्पर्धा सुरु आहे अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदें(Eknath Shinde)च्या ठाण्यात एका दिवसात ५ रूग्णांचे मृत्यू झाल्याबद्दल पटोलेंनी यावेळी खंत व्यक्त केली. राज्यात आरोग्यसेवा आजारी पडली आहे, रुग्णालयात डॉक्टर,नर्सेस,औषधे नाहीत. लोकांना साध्या वैद्यकीय सुविधाही मिळत.नाहीत. दुसरीकडे सरकारच्या जाहिराती,मात्र सुरु आहेत.
केवळ मूठभर लोकांचे हे सरकार आहे. राज्यात ७५ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत आणि सरकार शिक्षक भरतीच्या फक्त घोषणा करत आहे. शिक्षणव्यवस्था कोलमडली आहे.भाजपच्या या कारभाराला जनता कंटाळली असून आता तीच त्यांना सत्तेतून बाहेर करेल, असे पटोले म्हणाले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.