Imtiyaz Jaleel Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Imtiyaz Jaleel News: 'माझ्या घरावर हल्ला सहन करेल, पण मशिदीवर नाही'; इम्तियाज जलील भडकले

सरकारनामा ब्युरो

Vishalgad News : विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी 14 जुलै रोजी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोप रंगले आहे. मात्र, आंदोलनात सहभागी असलेल्या काही तरुण शिवभक्तांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

विशाळगडाच्या परिसरातील अतिक्रमण काढताना दगडफेक, जाळपोळ, मोडतोड तेथून चार किलोमीटर अलिकडे झाली. त्यामुळे अधिक सतर्कता घेण्यास हवी होती. दक्षता घेतली असती तर कदाचित हा अनर्थ टाळता आला असता. यावरून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी टीका केली आहे.

सर्व हिंदुत्वादी संघटनांना मी तिकडे नको आहे. येत्या काळात मी कोल्हापूरला जाण्याबाबत निर्णय घेणार आहे. कोल्हापूर तुमच्या बापाची जहागिरी नाही. खुले आम मशिदीची तोडफोड केली जातेय, याचा अतिक्रमणाशी सबंध नाही. पोलिसांनी जबाबदारी पार पाडली असती, तर असे झालेच नसते, असे इम्तियाज जलील म्हणाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते बोलत होते.

राज्यात काँग्रेस (Congress) असो राष्ट्रवादी आणि सेक्युलर पक्षाचे कोणते नॉन मुस्लिम लोक याबाबत निवेदन देत आहेत. माझ्या घरावर हल्ला सहन करेल, पण मशिदीवर नाही. कोणी तोडफोड केली यावर कारवाई करावी, असे आवाहन इम्तियाज जलील यांनी केले.

संभाजीनगरमधील एका मंदिरावर हल्ला होत होता. तेव्हा त्या ठिकाणी कोणता मर्द आला नव्हता. त्या ठिकाणी एकटा इम्तियाज जलील आला होता. विधानसभेची निवडणूक आली म्हणून तुम्हाला दर्गा आठवतो. सर्व हिंदुत्वादी संघटनाना मी तिकडे नको असल्याचे जलील यांनी स्पष्ट केले.

मी संभाजी महाराजांना एक प्रश्न विचारतो की, तुम्ही मला शाहू महाराजांचे पुस्तक दिले होते. मी आपल्याला हात जोडून विनंती करतो संभाजी महाराज, ते पुस्तक एकदा वाचा, असे आवाहन माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT